जय योगीश्वर दत्त दयाळ ।
तूंच एक जगती प्रतिपाळ ॥१॥
अत्र्यनुसये करूनि निमित्त ।
प्रगटसि जगतास्तव निश्चित ॥२॥
ब्रह्माऽच्युतशंकर अवतार ।
शरणांगतासि तूं आधार ॥३॥
अंतर्यामी ब्रह्यस्वरूप ।
बाह्य गुरु नररूप सुरूप ॥४॥
काखिं अन्नपूर्णा झोळी ।
शांति कमंडलु करकमळी ॥५॥
कुठें षड्भुजा कोठें चार ।
अनंत बाहू तूं निर्धार ॥६॥
आलो चरणी बाळ अजाण ।
दिगंबरा, उठ जाई प्राण ॥७॥
ऐकुनि अर्जुन-भक्ती-साद ।
प्रसन्न झाला तूं साक्षात् ॥८॥
दिधली ऋद्धी सिद्धी अपार ।
अंती मोक्ष महापद सार ॥९॥
केला कां तूं आज विलंब?
तुजविण मजला ना आलंब ॥१०॥
विष्णुशर्म द्विज तारुनिया ।
श्राद्धिं जेंविला प्रेममया ॥११॥
जंभे देवा त्रासविले ।
कृपामृते त्वां हांसविलें ॥१२॥
पसरी माया दितिसुत मूर्त ।
इंद्रा करवी वधिला तूर्त? ॥१३॥
ऐसी लीला जी जी शर्व ।
केली, वर्णिल कैसी सर्व? ॥१४॥
घेई आयु सुतार्थी नाम ।
केला त्यातें तूं निष्काम ॥१५॥
बोधियले यदु परशुराम ।
साध्य देव प्रह्लाद अकाम ॥१६॥
ऐसी ही तव कृपा अगाध ।
कां न ऐकसी माझी साद ॥१७॥
धांव अनंता, पाहि न अंत ।
न करी मध्येच शिशुचा अंत ॥१८॥
पाहुनि द्विजपत्नीकृत स्नेह ।
झाला सुत तूं निःसंदेह ॥१९॥
स्मर्तृगामी कलितार कृपाळ ।
जडमुढ रजका तारी दयाळ ॥२०॥
पोटशुळी द्विज तारियला ।
ब्राह्यणश्रेष्ठी उद्धरिला ॥२१॥
सहाय कां ना दे अजरा? ।
प्रसन्न नयने देख जरा ॥२२॥
वृक्ष शुष्क तूं पल्लविला ।
उदास मजविषयी झाला ॥२३॥
वंध्या स्त्रीची सुत-स्वप्नें ।
फळली झाली गृहरत्नें ॥२४॥
निरसुनि विप्रतनूचे कोड ।
पुरवी त्याच्या मनिचें कोड ॥२५॥
दोहविली वंध्या महिषी ।
ब्राह्मण दारिद्र्या हरिसी ॥२६॥
घेवडा भक्षुनि प्रसन्न-क्षेम ।
दिधला सुवर्ण घट सप्रेम ॥२७॥
ब्राह्मण स्त्रीचा मृत भ्रतार ।
केला सजीव, तूं आधार ॥२८॥
पिशाच्च पीडा केली दूर ।
विप्रपुत्र उठवीला शूर ॥२९॥
अंत्यज हस्तें विप्रमदास ।
हरुनी रक्षिले त्रिविक्रमास ॥३०॥
तंतुक भक्ता क्षणांत एक ।
दर्शन दिधले शैलीं नेक ॥३१॥
एकत्र वेळी अष्टस्वरूप ।
झाला अससी, पुन्हां अरूप ॥३२॥
तोषविले निज भक्त सुजात ।
दाखवुनि प्रचिती साक्षात ॥३३॥
हरला यवननृपाचा कोड ।
समता ममता तुजला गोड ॥३४॥
राम-कन्हैया रूपधरा ।
केल्या लीला दिगंबरा! ॥३५॥
शिला तारिल्या, गणिका, व्याध ।
पशुपक्षी तुज देती साद ॥३६॥
अधमा तारक तव शुभ नाम ।
गाता किती न होती काम ॥३७॥
आधि-व्याधि-उपाधि-गर्व ।
टळती भावें भजतां सर्व ॥३८॥
मूठ मंत्र नच लागे जाण ।
पावे नर स्मरणे निर्वाण ॥३९॥
डाकिण, शाकिण, महिषासूर ।
भूतें, पिशाच्चें, झिंद, असूर ॥४०॥
पळती मुष्टी आवळुनी ।
धून-प्रार्थना-परिसोनी ॥४१॥
करुनि धूप गाइल नेमें ।
दत्तवावनी जो प्रेमें ॥४२॥
साधे त्याला इह परलोक ।
मनी तयाच्या उरे न शोक ॥४३॥
राहिल सिद्धी दासीपरी ।
दैन्य आपदा पळत दुरी ॥४४॥
नेमे बावन गुरुवारी ।
प्रेमे बावन पाठ करी ॥४५॥
यथावकाशे स्मरी सुधी ।
यम ना दंडे त्यास कधी ॥४६॥
अनेक रूपी हाच अभंग ।
भजतां नडे न मायारंग ॥४७॥
सहस्र नामें वेष अनेक ।
दत्त दिगंबर अंती एक ॥४८॥
वंदन तुजला वारंवार ।
वेद श्वास हें तव निर्धार ॥४९॥
थकला वर्णन करतां शेष ।
कोण रंक मी बहुकृत वेष ॥५०॥
अनुभवतृप्तीचे उद्गार ।
ऐकुनी हंसता खाइल मार ॥५१॥
तपसी तत्त्वमसी हा देव ।
बोला जयजय श्री गुरुदेव ॥५२॥
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
श्री गुरुदत्त सम्बन्धित अन्य पृष्ठ
श्री गुरुदत्ताची आरती | Shree Gurudatta Aarti
श्री दत्ता अष्टकम | Shree Datta Ashtakam
श्री दत्त अथर्वशीर्ष | Datta Atharvashirsha
दत्तात्रेय वज्र कवचम् | Dattatreya Vajra-Kavacham
श्री दत्तस्तवस्तोत्र | Shri Dattastav Stotram
श्री दत्त स्तव स्तोत्र | Shri Datta Stav Stotram
दिव्य श्री दत्तात्रेय स्तोत्र | Divya Shree Dattatreya Stotram
श्री दत्त घोरकष्टोद्धरण स्तोत्र | Shree Gurudatta Ghorkashtodharan Stotra
श्री गुरुस्तवन स्तोत्र | Shree Gurustavan Stotra