श्री गुरुचरित्र सप्तशती अध्याय सत्तेचाळीसावा

सप्तशती गुरूचरित्र अध्याय सत्तेचाळीसावा | Saptashati Gurucharitra Adhyay 47

भक्त अतिप्रियसात । दिवाळीच्या सणानिमित्त ।
न्यायागुरुसीगृहाप्रत । प्रार्थितीं सप्तग्रामवासी ॥१॥

गुरु तोषवाया तयां । सातरुपें धरोनियां ।
जाती सातांच्या आलया । राहूनियां तया ग्रामीं ॥२॥

तों विस्मित होऊनी पुढती । एकामेकां झगडती ।
माझे घरीं गुरुमूर्ति । करिती दिपावळी असे ॥३॥

ग्रामलोक मिथ्या म्हणती । येथेंची होती गुरुमूर्ति ।
दिल्ही खूण सर्व दाविती । गुरु म्हणती सर्व सत्य ॥४॥

होसी केवळ परब्रह्म । असें स्तविंती ते सप्रेम ।
तयां भक्तां गुरुत्तम । देती धाम अलभ्य जें ॥५॥

इति श्री०प०प०वा०स०वि सारे दीपावल्युत्सववर्णनं नाम सप्तचत्वारिंशो०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *