ॐ नमो विघ्नराजाय सर्वसौख्यप्रदायिने |
दुष्टारिष्टाविनाशाय पराय परमात्मने || 1 ||
लम्बोदरं महावीर्यं नागयज्ञोप शोभितं |
अर्धचन्द्रधरं देवं विघ्नव्यूह विनाशनं || 2 ||
ॐ ह्रां ह्रीं ह्रं ह्रैं ह्रौं ह्रः हेरम्बाय नमो नमः |
सर्वसिद्धिप्रदोसि त्वं सिद्धिबुद्धिप्रदोभव || 3 ||
चिन्तितार्थप्रदस्त्वं हि सततं मोदकप्रियः |
सिन्दूरारुणवस्त्रेश्च पूजितो वरदायकः || 4 ||
इदं गणपतिस्तोत्रं यः पठेद भक्तिमान नरः |
तस्य देहं च गेहं च स्वयं लक्ष्मीर्न मुञ्चति || 5 ||
|| गणेश-लक्ष्मी स्तोत्र सम्पूर्णं ||
श्री गणेश-लक्ष्मी स्तोत्र अर्थ मराठी अनुवाद | Ganesha Lakshmi Stotra Marathi Meaning
ॐ नमो विघ्नराजाय सर्वसौख्यप्रदायिने |
दुष्टारिष्टाविनाशाय पराय परमात्मने ||
संपूर्ण आनंद देणार्या सच्चिदानंदाचे रूप असलेल्या विघ्नराजा गणेशाला मी वंदन करतो. तू परमात्मा आहेस. जो वाईट, दुष्ट ग्रहांचा नाश करतो. त्या गणपतींना मी नमस्कार करतो.
लम्बोदरं महावीर्यं नागयज्ञोप शोभितं |
अर्धचन्द्रधरं देवं विघ्नव्यूह विनाशनं ||
जो पराक्रमी, लांब उदराचा, अर्धचंद्र धारण करणारा, आणि सर्व अडथळ्यांचा नाश करणारा आहे. मी त्या गणपतीची पूजा करतो.
ॐ ह्रां ह्रीं ह्रं ह्रैं ह्रौं ह्रः हेरम्बाय नमो नमः |
सर्वसिद्धिप्रदोसि त्वं सिद्धिबुद्धिप्रदोभव ||
ओम ह्रम ह्रीं ह्रण ह्रौन ह्रह हेरंबाला वंदन केले जाते.
हे देवा, तुम्हीच सर्व सिद्धिंचे दाता आहात, आणि आमच्यासाठी तुम्ही सिद्धि-बुद्धि दायक आहात.
चिन्तितार्थप्रदस्त्वं हि सततं मोदकप्रियः |
सिन्दूरारुणवस्त्रेश्च पूजितो वरदायकः ||
तुम्हाला नेहमीच मोदक आवडतात.
मनात केलेल्या विचारांना अर्थ देणारा तू आहेस.
सिंदूर आणि लाल वस्त्र तुला प्रिय आहे आणि सिंदूर आणि लाल वस्त्राने पूजा केल्याने, तू नेहमी आशीर्वाद देतो.
इदं गणपतिस्तोत्रं यः पठेद भक्तिमान नरः |
तस्य देहं च गेहं च स्वयं लक्ष्मीर्न मुञ्चति ||
जो व्यक्ती गणेश-लक्ष्मी स्तोत्राचा पाठ श्रद्धा-भक्तीसह करतो, त्याच्या घरी लक्ष्मी कायम वास करते आणि सर्व सुखांची प्राप्ती होते.
अन्य स्तोत्र संग्रह








