श्री पुरुषोत्तम मास अध्याय चौदावा

अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 14 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 14

श्री गणेशाय नमः ॥

श्रीपांडुरंग रुक्मिणीरंगा ॥ मुनीमानस ह्रदयभृंगा ॥
नाम अनामातीत अभंगा ॥ नेई भंगा दुरितातें ॥ १ ॥

ऐका श्रोते सादर आतां ॥ मागील कथाभाग निरुता ॥
अनुमोदन देऊनि तत्वता ॥ परिसा आतां कथानक ॥ २ ॥

ऋषींमाजी शिरोमणी ॥ महाराज दुर्वासमुनी ॥
वासवाते विचारूनी ॥ निघता जाला तात्काळीक ॥ ३ ॥

साठसहस्र ऋषींचा मेळा ॥ घेऊन पातला भूतळा ॥
मार्गी चालतां तयाला ॥ विचार आठवला मानसीं ॥ ४ ॥

ते धन्याः कृतकृत्याश्चतैः प्राप्तं जन्मनः फलं ॥
सर्वार्थोधिगतस्तैस्तुयैर्दत्तंद्वादशीदिने ॥ १ ॥

कलायामपि द्वादशया मन्नदानं करोति यः ॥
सौभाग्यं वर्धतेतस्य तस्यायुर्नैवहीयते ॥ २ ॥

पापकोटि सहस्त्राणि पापकोटि शतानिच ॥
विलयं यांति देवेशि मलमासेतिथौमम ॥ ३ ॥

दुर्वास विचारी निजमनीं ॥ ते धन्य या त्रिभुवनीं ॥
जे अर्पिती द्विजा अन्नदानीं ॥ कृतकृत्य तयानें पै ॥ ५ ॥

सुफळ तयाचा जन्म पाहीं ॥ व्रत तपें दानें सर्वही ॥
तीर्थाटणें आदिकरूनही साधिली त्याणें द्वादशी ॥ ६ ॥

या अन्नदानें करुन पाहीं ॥ सकळ सौभाग्य तो लाही ॥
तयातें कधीं न घडे अपाई ॥ पापक्षय होय तेणें ॥ ७ ॥

कोटि पापें घडली तयासी ॥ तरी संहारी एक द्वादशी ॥
तयामाजीही मळमासीं ॥ विशेषाविशेषीं जाणिजे ॥ ८ ॥

या ऐसिया पर्वकाळातें ॥ जे करित नाहींत दानातें ॥
अन्नदान न घडे जयातें ॥ धिक् तयातें जन्मोनियां ॥ ९ ॥

जन्मा येवोनि केलें काई ॥ आचारविचार पाहिलाच नाहीं ॥
अन्नदान केलेंच नाहीं ॥ पुण्यलेश नाहीं गाठींसी ॥ १० ॥

जरी जाला श्रीमान बरवा ॥ तरी काय करावें तयाचे गौरवा ॥
जो विन्मुख झाला केशवा ॥ तो काय जाळावा स्मशानीं ॥ ११ ॥

ते धन्य आचरती व्रतातें ॥ अनुसरले अन्नातें ॥
तेचि प्रिय केले भगवंतें ॥ पापलेश तयातें नातळे ॥ १२ ॥

म्हणोनि धन्य तो अंबरिष ॥ जो दानामाजी दानाधीश ॥
सकळ भूसुरामाजी ईश ॥ नसे लवलेश पापाचा ॥ १३ ॥

त्यातें छळावया पाहीं ॥ आम्हीं जातसों लवलाहीं ॥
तया रक्षिता शेषशायी ॥ न चले नवाई आमची तेथें ॥ १४ ॥

पुण्यवंत तो भूपती जाण ॥ करूं तयाचें दर्शन ॥
मग अग्रभागीं जें कथन ॥ सुखें करूनि घडो तें ॥ १५ ॥

ऐसी चित्तीं विचारणा ॥ करूनि चालिला ऋषीराणा ॥
त्वरें पावला नृपभुवना ॥ केली गर्जना समस्तीं ॥ १६ ॥

जयजयकाराचेनि घोषें ॥ ऐकतां नृप संतोषें ॥
अतिउल्हासें निजमानसें ॥ सामोरा येत नृप तयातें ॥ १७ ॥

दंडप्राय लोटांगणीं ॥ समस्तातें नमूनी ॥
बद्धहस्तें प्रवर्ते स्तवनीं ॥ मधुर वचनीं आनंदें ॥ १८ ॥

ते धन्य या संसारीं नर ॥ ऐकतां आनंदती द्विजवर ॥
अर्पिती पूजा प्रकार ॥ आणि अग्रहार द्विजातें ॥ १९ ॥

भोजनातें इच्छिती पदार्थ ॥ वरी धनवस्त्रासहित ॥
तयावरी कृपाळु अनंत ॥ निवारी आघात निजांगें ॥ २० ॥

ब्राह्मण पातलिया निजगृहीं ॥ भ्रूलतेसी ग्रंथी घालिती पाही ॥
म्हणती आमुचा हात रिकामा नाहीं ॥ परता होई भटबावा ॥ २१ ॥

ऐसें जे ब्राह्मणातें ॥ धिःकार असो तयातें ॥
तैसा नव्हे अंबरीष नृपनाथ ॥ परम भावार्थ विनवीत ॥ २२ ॥

म्हणत धन्य आजिचा पर्वकाळ ॥ माझा भाग्योदय झाला सफळ ॥
घेऊनि समुदाय सकळ ॥ गृहा पातला न प्रार्थिता ॥ २३ ॥

कोटि पर्वकाळ एकवटले ॥ किंवा चंद्रसूर्य एकवटले ॥
तेंचि फल आजी लाधलें ॥ दर्शन दिधलें महाराजा ॥ २४ ॥

बोलोनि ऐसि मधुरवाणी ॥ आसन दिधलें समस्ता लागुनी ॥
पूजा प्रकार आणवूनीं ॥ पुरस्कार पूजनीं अनुसरला ॥ २५ ॥

तंव बोलता झाला ऋषि बोल ॥ पोटीं क्षुधेचा असे बंबाळ ॥
तेथें पूजा प्रकार न रुचे सकळ ॥ विषवत सकळ गमताती ॥ २६ ॥

कालची असे एकादशी ॥ अवघा वेळ उपवासी ॥
संधी साधून द्वादशी ॥ पातलों ठायासी तूझिया ॥ २७ ॥

क्षुधा हे पापिणी दारुण ॥ सुचों नेदि संध्या-स्नान ॥
पोटीं पेटलिया जठरान्न ॥ अन्ना परान्ना नेणेची ॥ २८ ॥

यालागीं नृपनाथा वरिष्ठा ॥ समुदायासी बरवंटा ॥
अन्नवोगरीं धर्मिष्ठा ॥ आणिक वाटा नवजावें ॥ २९ ॥

तीन प्रहर जाहलीया निशी ॥ आम्हीं जातसों स्नानासी ॥
विलंब नाहीं स्नान संध्येसी ॥ सत्वर माघारें येतसों ॥ ३० ॥

ऐकून ऋषींचें उत्तर ॥ मनीं हर्षयुक्त नृपवर ॥
म्हणे कृतकृत्य जालों फार ॥ केला उद्धार महाराजा ॥ ३१ ॥

आजी साधन द्वादशी ॥ मी लाधलों परम सुकृतेसीं ॥
पार नाहीं माझ्या भाग्यासी ॥ समुदायासी पातलेती ॥ ३२ ॥

तरी स्वामींचे दयेकरून ॥ सकळ पदार्थ अनुकूल जाण ॥
परी असे एक विज्ञापन ॥ कृपाघना परिसीजे ॥ ३३ ॥

माझा तंव अलोट नेम ॥ जो हरिहरातें दुर्गम ॥
तो सिद्धी न्यावा जी सुगम ॥ कृपा करूनि दातारा ॥ ३४ ॥

तरी साधिजे साधन द्वादशी ॥ विलंब न लावावा स्नानासी ॥
न होता भानु उदयासी ॥ भोजनासीं बैसावें ॥ ३५ ॥

हेची विनंती परिसावी ॥ कृपाळुत्वें सिद्धी न्यावी ॥
तथास्तु म्हणे भट गोसावी ॥ समुदाय ऋषिरावो ॥ ३६ ॥

स्नानातें गेला ऋषींचा मेळा ॥ नृप पातला त्वरें पाकशाळा ॥
साठ खंडी अन्नगोळा ॥ एकला कवळी दुर्वासु ॥ ३७ ॥

इतर मंडळी साठ सहस्र ॥ अन्नें पचविली षड्रस ॥
रायें सावरून स्नान संध्येस ॥ देवार्चनासीं बैसला ॥ ३८ ॥

षोडशोपचारें पूजा ॥ अर्पूनियां गरुडध्वजा ॥
पंचमहायज्ञ महाराजा ॥ करूनि बैसला निवांत ॥ ३९ ॥

राव बैसला मार्ग लक्षीत ॥ तंव दिनकर उदयो होऊं पाहत ॥
साधनवेळा तेणें साधीत ॥ राव मनांत गजबजला ॥ ४० ॥

म्हणोनियां लवडसवडी ॥ दूत धाडिले अति तांतडी ॥
ते लक्षूनियां गंगेची थडी ॥ ऋषिराया हाकारिलें ॥ ४१ ॥

येरीकडे गंगातीरी ॥ अघमर्षण ऋषी करी ॥
कोणी शिरोनि जळामाझारी ॥ स्नानें बरि सारिताती ॥ ४२ ॥

कोणी करिती स्तोत्रपाठ ॥ कोणाचे न हालती ओंठ ॥
जप करिती एकनिष्ठ ॥ कोणी नीळकंठ आराधिती ॥ ४३ ॥

ऐसें ब्राह्मण ठायींठायीं ॥ गुंतते जाले ते समयीं ॥
तंव राजदूत पाहोन ह्रदयीं ॥ घाबरेपणें बोलती ॥ ४४ ॥

म्हणती महाराजा सत्वर ॥ बाहात असेजी नृपवार ॥
भोजनातें होतसे उशीर ॥ चलावें सत्वर स्वामियां ॥ ४५ ॥

प्रत्युत्तर न देती बापुडीं ॥ एक धरून नासिक बोंडी ॥
एक उघडी करून शेंडी ॥ लवडसवडी झाडिती ॥ ४६ ॥

तंव करूनियां अघमर्षण ॥ दुर्वास बोले वचन ॥
अद्यापि झालें नाहीं ध्यान ॥ जपतर्पणीं विधियुक्त ॥ ४७ ॥

भानु उदय न होतां ॥ केवी अर्घ्य तर्पणाची वार्ता ॥
जाऊनि सांगा नृपनाथा ॥ विधि विधानता सारूनि येऊं ॥ ४८ ॥

आम्हीं ब्राह्मण नसों अन्नार्थी ॥ स्नान संध्या सारून परती ॥
बैसावें येऊन पंक्ति ॥ तैसी आमुची स्थिती नसेची ॥ ४९ ॥

जे न करिती संध्यास्नान ॥ विधियुक्त तिळतर्पण ॥
तैसेंची सारिती भोजन ॥ तरी ते ब्राह्मण नव्हेती ॥ ५० ॥

शूद्रवत ते नर जाण ॥ रवरवीं तयाचे पितृगण ॥
काय ब्राह्मण कुळीं जन्मोन ॥ सार्थक कवण जन्माचें ॥ ५१ ॥

तरी जाऊनि सांगा रायासीं ॥ क्षण एक अवकाश भोजनासी ॥
सारूनियां नित्य नेमासी समुदायासी येतसो ॥ ५२ ॥

ऐसें ऋषीचें उत्तर ॥ ऐकून दूत परतले सत्वर ॥
जेथें असे नृपवर ॥ सांगती सत्वर वृत्तांत ॥ ५३ ॥

नृपें ऐकून वचनासी ॥ परम संकोचित मानसीं ॥
म्हणे विघ्न दिसे द्वादशी ॥ न साधे साधनासी आजी पै ॥ ५४ ॥

तरीं उपावो करावा कवण ॥ परम कोपिष्ठ दुर्वास जाण ॥
शाप देईल न लागतां क्षण ॥ परम विघ्न उदेलें हें ॥ ५५ ॥

आजपर्यंत साधनासी पाहीं ॥ अपायो घडला नसे कांहीं ॥
अहो देवा हें काई ॥ कैसी नवाई उदेली ॥ ५६ ॥

ऐसी चिंता करितां ह्रदयांत ॥ परम सचिंत नृपनाथ ॥
तंव संधी पातली त्वरित ॥ साधन वेळा द्वादशी ॥ ५७ ॥

मग नृपें विचारून मानसी ॥ करिता जाला महायज्ञासीं ॥
नैवेद्य अर्पूनि महाविष्णूसी ॥ देव तीर्थासी प्राशिलें ॥ ५८ ॥

सिद्ध करून आयती ॥ मार्ग लक्षीत नृपती ॥
स्वस्थ बैसलासे चित्तीं ॥ ऋषिमार्ग लक्षीतेस ॥ ५९ ॥

येरीकडे गंगातीरीं ॥ ऋषीतें जाणवलें अंतरीं ॥
मग उठता झाला झडकरी ॥ समुदायेसी ऋषिरावो ॥ ६० ॥

परम लगबगेंते अवसरीं ॥ पातले नृपाचिया महाद्वारीं ॥
करूनियां जयजयकारी ॥ म्हणे सत्वर सारीं यज्ञातें ॥ ६१ ॥

करूनि पंच महायज्ञातें ॥ नैवेद्य अर्पी देवातें ॥
उशीर जाहलासे भोजनातें ॥ तुझिया व्रतातें नृपवरा ॥ ६२ ॥

रायें ऐकूनियां वचन ॥ म्हणे सकळ विधि सारून ॥
करूनियां तीर्थग्रहण ॥ साधन वेळां साधिली ॥ ६३ ॥

आतां भोजन मात्र असे उरलें ॥ ऋषी म्हणे आहा काय केलें ॥
तूंतें तव भोजन घडलें ॥ शेष उरलें तें ब्राह्मणातें ॥ ६४ ॥

तीर्थ प्रसाद ग्रहण करितां ॥ तरी भोजना समानची तत्वतां ॥
आम्ही न सेवूचि आतां ॥ शेष अन्न नृपवर्या ॥ ६५ ॥

तूं तंव परम सूज्ञराया ॥ केवी आचरलासी हे क्रिया ॥
म्हणोन परम क्रोध ऋषिवर्या ॥ ह्रदयामाजी उपजला ॥ ६६ ॥

म्हणें चांडाळा पाही आतां ॥ मज ऋषीतें उपेक्षून तत्वतां ॥
माझा महिमा तुवां नेणतां ॥ केवीया व्रता साधिलें ॥ ६७ ॥

क्रोधें थरथरां कांपतसे ॥ दोन्ही अधरपुटीं हालतसे ॥
सर्वांगी क्रोधें लवतसे ॥ काय बोलतसे रायातें ॥ ६८ ॥

गर्व जाहला तुझिया मानसीं ॥ मीच साधितों द्वादशी ॥
तरीं स्वीकारी आतां शापासीं ॥ भोगीं गर्भवासीं शतजन्म ॥ ६९ ॥

ऐसा शाप ऋषीं वदतां ॥ घाबरा जाला नृपनाथा ॥
म्हणे केउता उदेला अनर्था ॥ म्हणोन कांपत थरथरां ॥ ७० ॥

पहा केवढा अनर्थ रायातें ॥ अभिमान वोढवला तयातें ॥
अभिमान न साहे भगवंतातें ॥ प्रिय तयाते निराभिमान ॥ ७१ ॥

निराभिमान कर्मकरितां ॥ तो परमप्रिय भगवंता ॥
यालागीं न धरीजे अहंता ॥ जाणते पुरुषांनीं ॥ ७२ ॥

पुण्यमार्ग आचरतां पाहाहो ॥ तेथें उत्पन्न झाला अपावो ॥
म्हणोनि नाचरावें हा हो ॥ झणी ऐसें न म्हणावे ॥ ७३ ॥

जें पुण्यकर्म आचरलें ॥ तें केवीं वाया गेलें ॥
ऐसें न म्हणावें वहिलें ॥ तें ऐका सावधान ॥ ७४ ॥

भावेवीण देवाधिदेवो ॥ केवी आतुडले पाहाहो ॥
परि केलिया कर्माचा निर्वाहो ॥ देवाधिदेवो संपादी ॥ ७५ ॥

जैसे उत्तम भूमीसी कण ॥ पेरितां होय वर्धमान ॥
जरी अपूर्ण जाला घन ॥ परी न जाय कण तेथीचे ॥ ७६ ॥

तेवी सत्पात्रीं दान देता ॥ ते वायां न जाय तत्वतां ॥
किंचित कृपाघन वोसरतां ॥ पीक हाता लागतसे ॥ ७७ ॥

म्हणोनियां अनन्यभावें ॥ निराभिमानें कर्म करावें ॥
तेंची प्रियकर रमाधवे ॥ भावार्थबळें करूनियां ॥ ७८ ॥

असो आतां हे समग्र ॥ कथा भाग राहिला दूर ॥
कर जोडुनियां नृपवर ॥ उभा समोर ऋषींच्या ॥ ७९ ॥

म्हणे स्वामिया महाराजा ॥ कवण अपराध देखिला माझा ॥
म्हणून शाप दिधला वोजा ॥ हें अधोक्षजा मानेना ॥ ८० ॥

ऋषी म्हणे ते समयीं ॥ तुवा तीर्थग्रहण करून पाहीं ॥
माझें वचन असत्य नाही ॥ भोजना बैसविसी आम्हातें ॥ ८१ ॥

पहा केवढे संकटीं नृपवर ॥ व्यसनीं पडला साचार ॥
परी कृपाळू तो सर्वेश्वर ॥ जाणें अंतर सकळांचें ॥ ८२ ॥

न पाचारिता ऋषिवरा ॥ आले समुदायासी मंदिरा ॥
तरी माघारे दवडितां नृपवरा ॥ अश्लाध्यवाणें दिसे कीं ॥ ८३ ॥

रिक्त हस्तें दवडितां पाहीं ॥ कठोर वचन बोलतां तेही ॥
तेणें तों संतापून ह्रदयीं ॥ अंतःकरणी शापितसे ॥ ८५ ॥

जरीं द्यावया नाहीं धन ॥ तरीं बरवा कीजे सन्मान ॥
परी वित्त असुनि न देववे दान ॥ हें विहितपण साजेना ॥ ८६ ॥

तरी थोडें अथवा फार ॥ देऊनि तोषवावें अंतर ॥
मग कृतज्ञता द्विजवर ॥ सहजची येऊं पाहे ॥ ८७ ॥

असंतुष्टा द्विजा नष्टा ॥ हे प्रतीपाद्य वेद प्रतिष्ठा ॥
यालागीं कर्म श्रेष्ठा ॥ विधिवाटा आचरिजे ॥ ८८ ॥

ऐसें कर्म अंबरीष ॥ करितां प्राप्त झाला नाश ॥
मग ह्रदयीं आठवी रमाविलास ॥ केला ध्यास बहु तेणें ॥ ८९ ॥

म्हणे वैकुंठवासी रमाधवा ॥ धाव कैवारिया ॥
केशवा मी तव अनुसरलों जीवभावा ॥ तुझिया सेवा जगदीशा ॥ ९० ॥

ब्राह्मण तंव तुझें मुख ॥ ऐसें जाणूनिया निष्टंक ॥
व्रत आचरलों एकनिष्ठ ॥ केवीं हें अरिष्ट उदेलें ॥ ९१ ॥

कवण पातकाची राशी ॥ म्हणोनि क्रोध आला तुजसी ॥
यालागीं शापितसे ऋषी ॥ कवण उपायासी करूं आतां ॥ ९२ ॥

तुझेंची मुख हे ब्राह्मण ॥ जाणोनि मांडिलें अन्नदान ॥
आणी तुझेची मुखें शापवचन ॥ उचितपण केवी देवा ॥ ९३ ॥

तरी कृपाळू तो दीनोद्धार ॥ ऐसें बोलती विधिहर ॥
तरी ऋषिवचनाचा वणवा थोर ॥ शांत करी कृपाघनें ॥ ९४ ॥

हे देवाधिदेवा कृपाघना ॥ दयाळुवा अघनाशना ॥
दीनोद्धारा पतितपावना ॥ असुरमर्दना दयानिधे ॥ ९५ ॥

तूं तव कृपेचा सागर ॥ ऐसें वदताती ऋषेश्वर ॥
तेथें ऐसी हे लहरी क्रूर ॥ पातली हरिहरा न लोटे ॥ ९६ ॥

कवण पातकाचा ठेवा ॥ मी तंव आचरलोंसे देवा ॥
म्हणोनि न येची करुणा ॥ ह्रदयीं केशवा तुझिया ॥ ९७ ॥

गर्भवासाचा चुकवावा पंथ ॥ यालागीं कीजे दान तपव्रत ॥
तेथेंही होतसे आघात ॥ तरी समूळ मात उडे कीं ॥ ९८ ॥

तरीं दीन वत्सलता ते कैसी ॥ केउती गेलीसे ऋषीकेशी ॥
सांग पां आम्हां दीनासी ॥ विचारून मानसीं गोविंदा ॥ ९९ ॥

पाहा करितां अन्नदान ॥ रायातें वोढवलें महाविघ्न ॥
तोची प्रत्यय मजलागून ॥ आला जाण तात्काळीं ॥ १०० ॥

ब्राह्मण भोजन केलें प्रथम दिवशीं ॥ प्रचीत देखिली प्रातःकाळासी ॥
न येतां न देतां दुर्जनासी ॥ गांठी पडली तात्काळीं ॥ १01 ॥

तयानें वोढून नेलें ॥ राजद्वारीं उभे केलें ॥
कारागृहातें भोगिलें ॥ अस्तमीत अस्नात ॥ 10२ ॥

प्रभू न करी वचनान्याये ॥ खोट्याचें खरें केलें पाहे ॥
दंड पावलों लवलाहे ॥ रौप्य नाणें ऋषि संख्या ॥ 10३ ॥

ऐसा पुण्यमार्गाचा प्रादुर्भावो ॥ तात्काळ फळला पाहा हो ॥
अंबरीषातें तोची न्यावो ॥ घडे पाहावो अनयासें ॥ 10४ ॥

म्हणे धावणें न करितां ॥ ब्रीद बुडो पाहे तत्वता ॥
मग माझीही वत्सलता ॥ केवी शोभे भूमंडळीं ॥ 10६ ॥

मग पवनातें टाकून मागें ॥ गरुडातें सोडून वेगें ॥
धांवणें केलें लागवेंगे ॥ उभाउभी अंतरंगीं उभा ठेला ॥ 10७ ॥

येरीकडे नृप चक्रचूडामणी ॥ जोडूनियां द्वयबद्धपाणी ॥
उभा ठेलासे ऋषि सन्निधानी ॥ तों चक्रपाणी देखिला ॥ 10८ ॥

सहस्र चपळेसमान ॥ तेज फांकलें देदीप्यमान ॥
एकाएकीं शेषशयन ॥ येऊन उभा ठाकला ॥ 10९ ॥

रायें पाहातांच नयनीं ॥ दंडप्राय लोटांगणीं ॥
उभा ठेला बद्धपाणी ॥ स्तुती स्तवनीं अनुवादें ॥ १1० ॥

दुर्वासें घातला नमस्कार ॥ उभा समुदायेंसीं सत्वर ॥
स्तुतिवादें जगदीश्वर ॥ ऋषेश्वर पूजितसे ॥ १1१ ॥

ऐसें होतां तये वेळीं ॥ बोलतां जाला वनमाळी ॥
नृपवरा पाहून ते वेळीं ॥ मुख कोमाले दिसतसे ॥ १1२ ॥

मग बोलतसे नृपवर ॥ कथिता जाला समाचार ॥
म्हणे परम कोपिष्ठ ऋषेश्वर ॥ निरर्थक शापिलें ॥ १1३ ॥

ऋषी शापाचा वणवा ॥ जाळूं पाहे देह भावा ॥
कृपाळू तू मेघ केशवा ॥ शीतळ करीं वर्षोनी ॥ १1४ ॥

ऐकून नृपाची करुणा ॥ बोले वैकुंठीचा राणा ॥
म्हणे दुर्वासें न करितां विचारणा ॥ शापिला राणा अंबरीष ॥ १1५ ॥

आधींच मलमास विशेष ॥ वरी द्वादशी तिथी सरस ॥
नृप आचरतां निर्दोष ॥ तरी शापास आधार केउता ॥ 1१६ ॥

द्वादश्यां पारणयेस्तु तोयदानं करोतियः ॥
तत्तोयं सागरेस्तुल्यं सप्तभिः सागरात्मजे ॥ ४ ॥

द्वादश्यां योदिने प्राप्ते तर्पणं कुरुते प्रिये ॥
जलं तदमृती भूय पितृणामुपतिष्ठति ॥ ५ ॥

द्वादश्यामन्नदानं वै यः करोति सुमध्यमे ॥
तेनैव तारिताः सर्वे नरकाच्छत पूर्वजाः ॥ ६ ॥

द्वादशीतें ब्राह्मणातें ॥ उदक अर्पिलें जरी त्यातें ॥
तरी फळ लाभे यज्ञातें ॥ स्वर्गी पितरांतें संतोष ॥ 1१७ ॥

जयानें व्रत केलें द्वादशी ॥ पार नाही त्याचिया पुण्यासीं ॥
मी जनार्दन संतोषी ॥ केवी तयासीं अघातू ॥ 1१८ ॥

वरी केलिया अन्नदान ॥ तयाचे पूर्वजा होय उद्धरण ॥
न करि तरी रवरव दारुण ॥ पितृगण भोगिती ॥ 1१९ ॥

ऐसीजे पुण्यतिथीसी ॥ नृप आचरतां पुण्यराशी ॥
तरी केवी बाधिजे तयासी ॥ शापभये ऋषीच्या ॥ 1२० ॥

परी तपश्चर्ये आगळा मुनी ॥ नेणोनि वदले शापवाणी ॥
तरी स्वयें मी चक्रपाणी ॥ सोसीन जाचणी गर्भवास ॥ 1२१ ॥

ऐसें वचन केशवाचें ॥ ऐकून ऋषी बोले साचे ॥
शत जन्म गर्भवासाचे ॥ वचन आमचें निघालें ॥ 1२२ ॥

तरी उश्शाप वाणी ऐक ॥ वरिचें शून्य टाकीं एक ॥
शेष उरे जो दशक ॥ तो अवश्यक भोगिजे ॥ 1२३ ॥

त्याहीमाजी चतुर्भाग रीतीं ॥ दोन्ही जलचरें दोन्ही वनचरें तीं ॥
दोन विप्र दोन भूपती ॥ रामकृष्ण तरती जडमूढ ॥ 1२४ ॥

ऐसा उश्याप वदता वाचा ॥ संतोष स्वामी दीनाचा ॥
गर्भवास निरसील रायाचा ॥ स्वयें तयाचा अंगिकारी ॥ 1२५ ॥

मग आनंदोनियां नृपती ॥ ऋषीमेळासीं श्रीपती ॥
साधूनिया द्वादशी तिथी ॥ कौतुक रीतीं दावित ॥ 1२६ ॥

विमान आणून तात्काळीं ॥ नृप उद्धारिला ते वेळीं ॥
ऐशी द्वादशी नव्हाळी ॥ ऋषि मंडळी विलोकीत ॥ 1२७ ॥

समस्तीं करुनि जयजयकार ॥ नमिते झाले शारंगधर ॥
अदृश्य जाला सर्वेश्वर ॥ इतुका प्रकार पै जाला ॥ 1२८ ॥

कथाभाग परम ऐकिला ॥ म्हणोनि श्रोतियां सकळा ॥
श्रवणद्वारें परिसविला ॥ एवं संपला पंचपर्व ॥ १२९ ॥

इतिश्रीमलमास माहात्म ग्रंथ ॥ पद्मपुराणाचें संमत ॥
मनोहरसुत विरचित ॥ चतुर्दशोध्याय गोड हा ॥ १४ ॥

ओंव्या ॥ १२९ ॥ श्लोक ६ ॥

॥ इति चतुर्दशोध्यायः ॥


पुरुषोत्तम/अधिक मास कथा अन्य अध्याय


अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 1 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 1
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 2 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 2
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 3 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 3
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 4 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 4
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 5 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 5
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 6 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 6
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 7 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 7
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 8 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 8
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 9 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 9
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 10 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 10

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *