सप्तशती गुरूचरित्र अध्याय पहिला

सप्तशती गुरूचरित्र अध्याय पहिला | Saptashati Gurucharitra Adhyay 1

नमः श्रीदत्तगुरवे हृद्वासोधौतिकारवे ।
स्वात्मज्योतिःप्रकाशाय सुखायानर्थशांतये ॥१॥

भूतं भव्यं भवच्चास्माज्जांयते येन जीवति ।
लीयते यत्र तद्‌ब्रह्म श्रीदत्ताख्यं त्र्यधीश्वरम्‌ ॥२॥

भक्तिगम्यस्य तस्येदं चरितं चित्तशुद्धये ।
संक्षेपेण स्फुंट वक्ति वासुदेवानंदसरस्वती ॥३॥

ग्रंथीं वासुदेव निमित्त । कर्ता करविता दत्त ।
तत्पदीं ठेवोनि चित्त । चरित ऐकोत संत हे ॥४॥

हें मानुनि जे वाचिती । किंवा भक्तिनें ऐकती ।
तेचि भवाब्धि तरती । उद्धरति निजकुळा ॥५॥

मनावाचा अगोचर । तो स्वच्छंदें हो गोचर ।
कलियुगीं यतीश्वर । नरसिंहसरस्वती ॥६॥

त्याचें चरित्र ऐकून । नामधारक ब्राह्मण ।
गाणगापुरीं दर्शन । घ्यावें म्हणून पातला ॥७॥

प्राणी ऊष्मानें तापून । इच्छिती छाया जीवन ।
तैसा त्रितापें तापून । ये लक्षून निजजीवना ॥८॥

जो ऊर्ध्व खालीं भरल । आंत बाहेर सांचला ।
नामधारक म्हणे त्याला । दत्ता मला भेट देई ॥९॥

तूंचि मूर्तिमंत ब्रह्म । त्रिमूर्ति तूं गुरु परम ।
कलियुगीं मंगलधाम । भक्तकामपूरक ॥१०॥

विशाल तव सत्कीर्ती । परिसोनि केली विनंती ।
तव कर्णावरी न ये ती । वाटे खंती सर्वज्ञा हे ॥११॥

जरी मज तूं नेणसी । तरी सर्वज्ञ कीं होसी ।
किंवा मातें उपेक्षिसी । दयाळूसी साजे हें कीं ॥१२॥

मी अधःपाता जाईन । जरी देसी उपेक्षून ।
सेवा इच्छी कीं तव मन । तेणें होसी कीं दाता ॥१३॥

सेवा शान ठेवून । मेघापरी दे जीवन ।
पूर्वी जेवी दिल्हें दान । विभीषणध्रुवादिकां ॥१४॥

किं मुख पसरितां । बाळपाशीं मागें माता ।
जरी बाळ मारी लाथा । तया माता टाकून दे कीं ॥१५॥

तूंची मम माता पिता । तूंची एक कुळदेवता ।
भिन्नभाव येथें नसतां । कोण दाता मज दुजा ॥१६॥

नरेश्वर सेवकवंशा । रक्षी न धरितां आशा ।
तूं अस्मत्पूर्वजेशा । सर्वेशा कीं उपेक्षिसी ॥१७॥

मी इत्यंभूत सर्व । कथितां ही नये द्रव ।
जेणे पाषाणा ये द्रव । तूं निर्द्रव होसी कैसा ॥१८॥

अशी प्रार्थना करुन । हो मूर्छित हें जाणून ।
दत्त चित्तीं प्रगटून । आश्वासन देयी स्वप्‍नी ॥१९॥

इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते प्रथमोऽध्यायः


श्री स्वामी समर्थ सप्तशती गुरूचरित्र अन्य अध्याय


श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय दहावा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 10
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय नववा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 9
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय आठवा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 8
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय सातवा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 7
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय सहावा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 6
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय पाचवा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 5
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय चौथा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 4
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय तिसरा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 3
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय दुसरा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 2
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय पहिला | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *