आतां स्वामी सुखें निद्रा करा अवधुता ।
स्वामी अवधुता ।
चिन्मय, सुखधामी जाऊनी, पहुडा एकांता ।।
वैराग्याचा कुंचा घेऊनी चौक झाडीला ।
गुरु हा चौक झाडीला ।।
तयावरी सप्रेमाचा शिडकावा केला ।।१।।
पायघड्या घातल्या सुंदर नवविधा भक्ती ।
सुंदर नवविधा भक्ती ।।
ज्ञानाच्या समया उजळुनी लाविल्या ज्योति ।।२।।
भावार्थाचा मंचक ह्रदयाकाशीं टांगिला ।
ह्रदयाकाशीं टांगिला ।।
मनाची सुमनें करूनी केलें शेजेला ।।३।।
द्वैताचे कपाट लोटुनी एकत्र केले ।
गुरु हे एकत्र केले ।।
दुर्बुध्दीच्या गांठी सोडुनी पडदे सोडीयले ।।४।।
आशा तृष्णा कल्पनेचा सांडुनी
गलबला गुरु हा सांडुनी गलबला ।।
दया क्षमा शांती दासी उभ्या शेजेला ।।५।।
अलक्ष उन्मनी घेउनी नाजुकसा शेला ।
गुरु हा नाजुकसा शेला ।।
निरजंनी सदगुरु माझा निजे शेजेला ।।६।।
श्री स्वामी समर्थ सम्बन्धित अन्य पृष्ठ
इतर लोकप्रिय आरती संग्रह








