आतां स्वामी सुखें निद्रा करा अवधुता ।
स्वामी अवधुता ।
चिन्मय, सुखधामी जाऊनी, पहुडा एकांता ।।
वैराग्याचा कुंचा घेऊनी चौक झाडीला ।
गुरु हा चौक झाडीला ।।
तयावरी सप्रेमाचा शिडकावा केला ।।१।।
Category: श्री स्वामी समर्थ
ॐ नमो श्री गजवदना | गणराया गौरीनंदना |
विघ्नेशा भवभयहरणा | नमन माझे साष्टागी || १||
नंतर नमिली श्री सरस्वती | जगन्माता भगवती |
ब्रम्ह्य कुमारी वीणावती | विद्यादात्री विश्वाची || २||
आता नमू मयुरवाहिनी | जी शब्दविश्वाची स्वामिनी | वंदन करुया तियेसी ||1||
जो सकल विश्वाचा आधार | निर्गुण आणि निराकार | तो ब्रम्हा-विष्णु-महेश्वर | सद्भावे वंदू त्रैमूर्ती ||2||
आधीं नमू श्रीसद्गुरूनाथा l भक्तवत्सल कृपावंता l तुजवांचूनि या जगीं त्राता l अन्य आतां नसेचि ll १ ll
अवतार घेतला समर्थ l नाम शोभे कृपावंत l पाप जाळूनियां सत्य l भार उतरिला जगतींचा ll २ ll
नाही जन्म नाही नाम | नाही कुणी माता पिता |
प्रगटला अदभुतसा | ब्रह्मांडाचा हाच पिता || १ ||
नाही कुणी गुरुवर | स्वये हाच सुत्रधार |
नवनाथी आदिनाथ | अनाथांचा जगन्नाथ || २ ||
नमो स्वामीराजम दत्तावताराम |श्री विष्णू ब्रम्हा शिवशक्तिरूपम ||ब्रह्मस्वरूपाय करूणाकाराय |नमो नमस्ते || हे स्वामी दत्तात्रय हे कृपाळा |मला ध्यान मूर्ती दिसू देई डोळा ||कुठे माय
असें पातकी दीन मीं स्वामी राया ।
पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया ॥
नसे अन्य त्राता जगी या दीनाला ।
समर्थां तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ॥
आरती स्वामी राजा । कोटी आदित्यतेजा ।
तु गुरु मायबाप । प्रभू अजानुभुजा ।
आरती स्वामी राजा ॥धृ॥
जय देव जय देव, जय जय अवधूता ।
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता।।
जय देव जय देव ॥धृ॥
जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था,
जय श्री स्वामी समर्था।
आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा
आरती स्वामी राजा । कोटी आदित्यतेजा ।
तु गुरु मायबाप । प्रभू अजानुभुजा ।
आरती स्वामी राजा ॥धृ॥
जय जय सद्-गुरु स्वामी समर्था,
आरती करु गुरुवर्या रे ।
अगाध महिमा तव चरणांचा,
वर्णाया मति दे यारे ॥धृ॥
ओवाळीतो काकड आरती स्वामी समर्थ तुजप्रती
। स्वामी समर्थ तुजप्रती। चरण दावी जगत्पते ।
स्मरतो तुझी अभिमूर्ती ॥
नि:शंक हो निर्भय हो मना रे,
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे,
अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी