श्री स्वामी समर्थ मानस पुजा

श्री स्वामी समर्थ मानस पुजा | Swami Samarth Manas Pooja

हे स्वामी दत्तात्रय हे कृपाळा |
मला ध्यान मूर्ती दिसू देई डोळा ||
कुठे माय माझी म्हणे बाळ कैसा |
समर्थ तुम्हाविना हो जीव तैसा ||

महाशक्ती जेथे उभ्या ठाकताती |
जिथे सर्व सिद्धी पदी लोळताती ||
असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ |
परब्रम्ह साक्षात गुरुदेव दत्त ||

हा अर्घ्य अभिषेक स्वीकारी माझा |
तुझी पद्य पुजा करी बाळ तुझा ||
प्रणिपात साष्टांग शरणागताचा |
तुम्हा वाहिला भार या जीवनाचा ||

वीणा तुताऱ्या किती वाजताती |
शंखादि वाद्ये पहा गर्जताती ||
म्हणती नगारे गुरुदेव दत्त
श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ ||

मी धन्य झालो हे तिथे घेता |
घडू दे पूजा हि यथासांग आता ||
अजानुबाहू भव्य कांती सतेज |
नसे मानवी देह हा स्वामी राज ||

वक्ष स्थळी लाविल्या चंदनाचा |
सुवास तो वाढावी भाव साचा ||
शिरी वाहूया बिल्व तुलसी दलाते |
गुलाब जय जुई अत्तराते ||

इथे लावया केशर कस्तुरीचा |
सुगंधी हा खूप नाना प्रतीचा ||
पुष्पांजली हि तुम्हा अर्पियेली |
गगनातुनी पुष्पवृष्टी जहाली ||

हृदयमंदिरांची हि स्नेह्ज्योती |
मला दाखवी स्वामींची योगमूर्ती ||
करू आरती आर्तभावे प्रभूची |
गुरुदेव स्वामी स्वामी दत्तात्रयाची ||

हे स्वामीराजा बस भोजनाला |
हा पंच पक्वान्न नैवेद्य केला ||
पुरांची पोळी तुम्हा आवडीची |
लाडू कारंजी असे हि खव्याची ||

तांबूल घ्यावा स्वामी समर्था |
चरणांची सेवा करू द्यावी आता ||
प्रसन्नतेतून मागू मी काय |
हृदयी ठेव माते तुझे दोन्ही पाय ||

धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला |
पदी ठेवू शीर शरणांगतला ||
हृदयी भाव यावे असे तळमळीचे |
करो पूर्ण कल्याण जे या जीवाचे ||

वसो माझ्या अंतरी स्वामी देव |
वसो माझ्या अंतरी स्वामी देव ||


श्री स्वामी समर्थ सम्बन्धित अन्य पृष्ठ


श्री स्वामी समर्थ तारक मंत्र | Shree Swami Samarth Tarak Mantra
श्री स्वामी समर्थ काकड आरती | Shri Swami Samarth Kakad Aarti
जय जय सद्-गुरु स्वामी समर्था  | Jai Jai Sadguru Swami Samartha-Aarati
आरती स्वामी राजा- स्वामी समर्थ आरती | Aarti Swami Raja- Swami Samarth Aarati
आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा -श्री स्वामी समर्थ आरती | Aarti Ovaloo Charani Theuniya Matha-Swami Samarth Aarati
जय जय अवधूता | स्वामी समर्थ आरती  | Jay Jay Avadhuta-Swami Samarth Aarati
स्वामी समर्थ मंत्र पुष्पांजली | Swami Samarth Mantra Pushpanjali
स्वामी समर्थ अष्टक | Swami Samarth Ashtak
श्री स्वामी समर्थ स्तवन | Swami Samarth Stavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *