श्री गुरुचरित्र सप्तशती अध्याय दुसरा

सप्तशती गुरूचरित्र अध्याय दुसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 2

ते पाहुन येरु उठे । तया पुढें सिद्ध भेटे ।
तया पुसे कोण तूं कोठें । जासी वाटे मायबाप ॥१॥

सिद्ध रम्य बोले वाचे । त्रिमूर्ति गुरु आमुचे ।
न देखती भक्त ज्याचे । तापदैन्याचे पसारे ॥२॥

ऐसे व्यक्त ऐकून । नामधारक बोले दीन ।
मी त्याचा भक्त असून । कां लोटून देई मला ॥३॥

विश्व यंत्र चालक दत्त । तेथें हा अस्थिरचित्त ।
हें जाणून बोले व्यक्त । सिद्ध मुक्तसंग जो ॥४॥

तूं स्वछंदे वागसी । व्यर्थ देवा दोष देसीं ।
कोप येतां इतरांसी । स्वभक्तांसीं राखी गुरु ॥५॥

एकदां तो कोपे जरी । न राखती हरहरी ।
येरु पुसे कवणेपरी । वद थोरीव गुरुची ॥६॥

म्हणे सिद्ध कलीप्रत । ब्रह्मा सांगे हे चरित ।
गोदावरीतीर स्थित । वेदधर्मशर्मा गुरु ॥७॥

तो स्वीय पातकान्त । करावया ये काशींत ।
तया दीपक सेवित । स्वयें कष्ट साहोनिया ॥८॥

सुहास्य मुखें सेवा करी । गुरु शिव्या देई मारी ।
न धरीं तें अंतरी । क्षालन करी मळमूत्र ॥९॥

अंध पङगु गलत्कुष्ठी । गुरु झाला महाक्रष्टी ।
शिष्या गांजी सेवेसाठीं । तरी करी सेवा शिष्य ॥१०॥

अपर्णापति हो प्रसन्न । शिष्या देयी वरदान ।
नाही गुर्वाज्ञा म्हणून । फिरवून धाडी शर्वा ॥११॥

त्याचा निश्चय जाणून । वर दे विष्णूही येऊन ।
शिष्य बोले सर्व दान । देईल पूर्ण गुरु माझा ॥१२॥

निश्चय त्याचा ओळखून । विष्णू भुक्तिमुक्तिदान ।
दे, गुरुही हो प्रसन्न । काय न्यून तया शिष्या ॥१३॥

हो अस्तंगत माया । गुरु प्रसन्न हो जया ।
भज सोडोनि संशया । करील दया त्रिमूर्ति हा ॥१४॥

इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य
श्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते द्वितीयो


श्री सप्तशती गुरूचरित्र अन्य अध्याय


सप्तशती गुरूचरित्र अध्याय पहिला | Saptashati Gurucharitra Adhyay 1
सप्तशती गुरूचरित्र अध्याय तिसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 3
सप्तशती गुरूचरित्र अध्याय चौथा | Saptashati Gurucharitra Adhyay 4
सप्तशती गुरूचरित्र अध्याय पाचवा | Saptashati Gurucharitra Adhyay 5
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 6
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सातवा | Saptashati Gurucharitra Adhyay 7
सप्तशती गुरूचरित्र अध्याय आठवा | Saptashati Gurucharitra Adhyay 8
सप्तशती गुरूचरित्र अध्याय नववा | Saptashati Gurucharitra Adhyay 9
सप्तशती गुरूचरित्र अध्याय दहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 10
सप्तशती अध्याय अकरावा | Saptashati Adhyay 11
सप्तशती गुरूचरित्र अध्याय बारावा | Saptashati Gurucharitra Adhyay 12
सप्तशती गुरूचरित्र अध्याय तेरावा | Saptashati Gurucharitra Adhyay 13

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *