बरवा प्रश्न ऐकून । गुरु म्हणे भस्में ज्ञान ।
दिधलें तें धूतां जाण । जाऊन हो अज्ञानी ॥१॥
पूर्वयुगीं वामदेव । क्रौंचवनी घेयी ठाव ।
त्या पाहुनि घेयी धांव । दुर्भाव तो राक्षस ॥२॥
तो दुर्गंधांगीं तेव्हां । धरी भक्षूं वामदेवा ।
भस्म लागतां दुर्भावा । त्यजुनी भवा पूर्वा स्मरे ॥३॥
तृटक्षुधा शांत झाली । म्हणे पंचवीस आपुलीं ।
स्पष्ट जन्में म्यां स्मरलीं । भूपकुलीं मी दुर्जय ॥४॥
धरुनि मी भोगीं स्त्रिया । राज्यमदें करुनियां ।
चारीं वर्णांच्याही भार्यां । भोगीं वेश्या असंख्यांत ॥५॥
अविवाहितांही भोगीं । रजस्वलाही न त्यागी ।
पुढें दैवें झालों रोगी । शत्रू वेगीं घेती राज्य ॥६॥
दुराशयें पाप केलें । स्त्रियांनीं बहु शापिलें ।
क्षयरोगें ग्रासियलें । अंतीं आले यमदूत ॥७॥
अपयात् क्षय आयुषः । हें कळलें निर्दोष ।
मी मरतां यमपुरुष । न्हेती दोष क्षाळांवया ॥८॥
भीदेश्रोत्रा यातना ती । पित्रांसह भोगुनी अंतीं ।
अंगीं शिश्नें हजार होती । प्रेतगती ये ती मला ॥९॥
तें गात्रही सोडून । मी चोवीस भोगीं योनी ।
ब्रह्मराक्षस होउनी । राहें वनीं सदा भुका ॥१०॥
ह्या पञ्चविसाव्या जन्मीं । गजा खातांही भुका मी ।
स्पर्शमात्रें शांतीं तुम्हीं । दिल्ही तुम्ही साक्षा देव ॥११॥
गेले क्षुत्पिपासादि । याचा हेतू सांगा आधीं ।
वामदेव म्हणे शुद्धी । झाली आधी गेला भस्में ॥१२॥
भस्म स्पर्शें एक जाण । द्राविड जार ब्राह्मण ।
त्यजिला शूद्रें मारुन । ये श्वान त्यावरि एक ॥१३॥
श्वस्पर्शनें तदंगस्थ । भस्म लागुनी झाला मृत ।
त्यांतें न्हेती यमदूत । शिवदूत सोडविती ॥१४॥
त्या सानंदें कैलासातें । न्हेता यम आला त्यातें ।
धर्म सांगून विप्रातें । दूत न्हेतें झाले तया ॥१५॥
शंभुच जाणें तन्महात्म्या । भस्म लावीं मी सर्वकाया ।
लागलें किंचित् तुझ्याकाया । ज्ञान तया योगें हो हें
वदे रक्ष राज्य करितां । वापी केल्या निर्जळपंथा ।
विप्रांवृत्ति दिधल्या आतां । आलें हातां त्याचें फळ ।
सांगे सविस्तर मला । भस्मधारण विधीला ।
वामदेव म्हणे शिवाला । प्रश्न केला हा कुमारें ॥१८॥
मग नंदीगौरीयुक्त । शिव बसे देवासहित ।
सनत्कुमार वंदुनी तेथ । करीतसे हा प्रश्न ॥१९॥
भो व्याघ्राजिनवास । चतुर्विध पुमर्थास ।
देई शीघ्र असें आम्हांस । सांगा खास स्वल्प साधन ॥२०॥
त्यां म्हणतसे ईश । धारण करीं भस्मास ।
चतुर्विध पुमर्थांस । दे हें खास सुसाधन ॥२१॥
नगमे ऐसें सुसाधन । गोमयें अग्निहोत्रांतून ।
भस्म घेई करीं धारण । भृसमान त्रिपुंड्रेसी ॥२२॥
हो नव देवादिक । एका एका पुंड्री देख ।
मध्यांगुष्टानामिका । काढीं रेखा शीर्षादिकीं ॥२३॥
हो हेंच पापशमन । असें वामदेव सांगून ।
करवी भस्मधारण । उद्धरुन गेला राक्षस ॥२४॥
गुरु असें सांगती । सर्व आनंदीत होती ।
गेला त्रिविक्रमयती । कथा पुढती सांगो ऐक ॥२५॥
इति श्री०प०प०वा०स० सारे भस्ममहिमावर्णनं नाम एकोनत्रिंशो०
श्री सप्तशती गुरूचरित्र अन्य अध्याय
सप्तशती गुरूचरित्र अध्याय पहिला | Saptashati Gurucharitra Adhyay 1
सप्तशती गुरूचरित्र अध्याय दुसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 2
सप्तशती गुरूचरित्र अध्याय तिसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 3
सप्तशती गुरूचरित्र अध्याय चौथा | Saptashati Gurucharitra Adhyay 4
सप्तशती गुरूचरित्र अध्याय पाचवा | Saptashati Gurucharitra Adhyay 5
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 6
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सातवा | Saptashati Gurucharitra Adhyay 7
सप्तशती गुरूचरित्र अध्याय आठवा | Saptashati Gurucharitra Adhyay 8
सप्तशती गुरूचरित्र अध्याय नववा | Saptashati Gurucharitra Adhyay 9
सप्तशती गुरूचरित्र अध्याय दहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 10
सप्तशती अध्याय अकरावा | Saptashati Adhyay 11
सप्तशती गुरूचरित्र अध्याय बारावा | Saptashati Gurucharitra Adhyay 12