श्री गुरुचरित्र सप्तशती अध्याय तेरावा

सप्तशती गुरूचरित्र अध्याय तेरावा | Saptashati Gurucharitra Adhyay 13

बाळवर्य ज्ञानज्योति । कृष्णमाधवसरस्वती ।
सदानंदोपेंद्रयती । सातवा मी हे मुख्य शिष्य ॥१॥

अधूर्त सर्व शांत । गुरु ऐशां शिष्यांसहित ।
आले जन्मभूमीप्रत । हो माताही यतिवंद्या ॥२॥

विनन्ति करुनी नर । विश्वरुपा घरोघर ।
न्हेती देती गुरुवर । परपार मायबापां ॥३॥

तो प्रभू म्हणे भगिनीला । दंपतीभेद केला ।
त्वां लातिलें हो धेनूला । पती त्यजील कुष्ठी होसी ।

ते भूयः प्रार्थितां म्हणती । वृद्धत्वीं पति हो यति ।
कुष्ठाची करीन शांति । स्त्रियां पति गती न अन्य ।

असें तये वेळीं तिला । सांगोन शिष्यमेळा ।
घेवोनि ये गोदावरीला । भूगोला उद्धरी जो ॥६॥

शिष्य मेळवी आणिक । माधवारण्यसंज्ञक ।
ज्ञान देउनी सम्यक् । विशोक केला गुरुनें ॥७॥

गुरुवर्य पुढें येती । तेथ एका विप्रा पाहती ।
मराया ये गोदेप्रति । दगड पोटीं बांधोनिया ॥८॥

तयाचा तो जाणून भाव । शिष्यां म्हणती घ्यारे धांवा ।
शिष्यें घेवोनिया धांव । तयास जवळ आणिला ।

तो साद्यंत पुसतां वदे । शूलपीडित मी प्राण दें ।
कुकर्मं केले पूर्वीं मदें । त्याचें फल दे देव हें की ।

नाहीं पुण्य पूर्वापार । मी झालों भूमीभार ।
गुरु म्हणती अनिवार । दोष फार आत्मघातें ॥११॥

तूं मरु नको रोगावर । औषध देतों मी शीघ्र ।
ऐसें म्हणती गुरुवर । तवं ये विप्र सायंदेव ॥१२॥

तो तोषवी श्रीरुसी । म्हणे द्विजमी कांचीवासी ।
गुरु म्हणती हा उपवासी । या द्विजासी जेवूं घालीं ।

हें साम्प्रत करी काज । सायंदेव म्हणे हा द्विज ।
अन्नवैरी झाला आज । दोष ये मज हा मरतां ॥१४॥

अपूप दे म्हणती तया । तें मानून गुरुराया ।
भिक्षेला ने प्रार्थुनियां । द्विज शिष्यांसमवेत ॥१५॥

धू पाद्ये गुरुचे पाद । पूजी विधीनें वंदी पाद ।
जेववी सर्वां हो सानंद । झाला विगद तोही विप्र ।

इति श्री०प०प०वा०स०वि०गु० सारे विप्रशूलहरणं नाम त्रयोदशो०


श्री सप्तशती गुरूचरित्र अन्य अध्याय


सप्तशती गुरूचरित्र अध्याय पहिला | Saptashati Gurucharitra Adhyay 1
सप्तशती गुरूचरित्र अध्याय दुसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 2
सप्तशती गुरूचरित्र अध्याय तिसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 3
सप्तशती गुरूचरित्र अध्याय चौथा | Saptashati Gurucharitra Adhyay 4
सप्तशती गुरूचरित्र अध्याय पाचवा | Saptashati Gurucharitra Adhyay 5
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 6
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सातवा | Saptashati Gurucharitra Adhyay 7
सप्तशती गुरूचरित्र अध्याय आठवा | Saptashati Gurucharitra Adhyay 8
सप्तशती गुरूचरित्र अध्याय नववा | Saptashati Gurucharitra Adhyay 9
सप्तशती गुरूचरित्र अध्याय दहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 10
सप्तशती अध्याय अकरावा | Saptashati Adhyay 11
सप्तशती गुरूचरित्र अध्याय बारावा | Saptashati Gurucharitra Adhyay 12

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *