श्री गुरुचरित्र सप्तशती अध्याय छत्तिसावा

सप्तशती गुरूचरित्र अध्याय छत्तिसावा | Saptashati Gurucharitra Adhyay 36

त्या ग्रामामध्यें एक । विप्र येक होता रंक ।
भावें करी आन्हीक । हो विवेकशून्यता तत्स्त्री ॥१॥

तो नेम धरुनी परान्न । सोडी, दंपती भोजन ।
द्याया आला महाजन । स्त्री जाऊनीं प्रार्थी गुरुसी ॥२॥

होता कंठ भरुनि दीन । गुरु विप्रा बोलावून ।
म्हणे इला जा घेऊन । तूं परान्न जेवाया ॥३॥

तीचें गार्‍हाणें ऐकून । तिच्या पतीस जा म्हणून ।
गुरु सांगे तो मानून । तिला घेऊन गेला तो ॥४॥

तेथें मानिनी जेवितां । श्वसूकरोच्छिष्ट देतां ।
उठे पतीसह दुश्चिता । गुरुनाथा भेटती दोघे ॥५॥

नारी विनवी क्षमापून । गुरु म्हणे धालें कीं मन ।
द्विज म्हणे नेम टाळून । भ्रष्ट होवून गेलों मीं ॥६॥

अवश्य ही वैरीण । गुरु म्हणे पुरें शीण ।
मी माया दावून । केलें मन शुद्ध ईचें ॥७॥

ही नच इच्छील आता । सोडील परान्नाची वार्ता ।
न मोडली तुझी निष्ठा । दि़ज अडतां घे परान्न ॥८॥

प्रार्थी भूसूर कोठें जावें । अन्न कोणाचें वर्जावें ।
गुरु म्हणे जेवावें । स्वसंबंधिगुरुमित्रान्न ॥९॥

वर्जी तामस कुचरान्न । विधिनिषेधरहितान्न ।
दुष्प्रतिग्रह दुर्भक्षान्न । कन्यान्न सुत न होता ॥१०॥

त्यजीं निन्दकादिकान्न । जेवितांही श्राद्धान्न ।
षट्‌ प्राणायाम शोधन । प्रेतान्न सर्वथा वर्जी ॥११॥

अग्नाधानिभागवतान्न । पवित्र करी ब्रह्मीष्ठान ।
तीर्थी क्षेत्री पर्वणीं दान । हीनदान कुदान न घे ॥१२॥

स्वाचारयुक्त नर । सर्व दोष करीं दूर ।
द्विज म्हणे सविस्तर । नित्याचार स्पष्ट सांगा ॥१३॥

गुरु यापरी प्रार्थित । सांगे पराशरमत ।
उठा ब्राह्ममुहूर्तांस । गुरुदेवतांदिकां वंदा ॥१४॥

व्हायाम्य मुख निशीं ऐक । दिवा संधी उदङ्‌मुख ।
नैऋत्यकोणी देख । मार्गोदकवर्जितदेशीं ॥

त्यजी हरित्तृण, शिरीं । वस्त्रधरीं जलदूरीं ।
मलमूत्रोत्सर्ग करीं । शौचकरी मृत्तोयानें ॥१६॥

गोळ्या मोठया आंवळ्यापरी । लिंगीं एकत्रि गुदावरी ।
सातसात पादकरीं । निम्मीं रात्री संकटी अर्ध ॥

हा द्विजवर्याचार । वर्णी वनी यतिश्वरां ।
द्वित्रिचतुगुर्णाचार । स्त्रीकुमारां दुर्गंधान्त ॥१८॥

होत साचविधी शूद्रा । विप्रें किजे चूळ बारा ।
आठ सहा चार ईतरां । अंतीं द्विराचमनें शुद्धीं ।

मुदा पुण्य मध्यस्नान । प्रातःकाळीं गोमयस्नान ।
यति सन्यासी त्रिस्नान । सुभगे शिरःस्ना न नित्य ।

शीतोष्णाम्बु गृहस्थासी । मार्जनादि न तयासी ।
तर्पणादि बहिःस्नानासी । कीजे शिरसीं मृद्धारण ॥

अनामिकीं दर्भ पवित्र । बद्धशिख सोपवस्त्र ।
संध्या करा जो प्रकार । गृह्यकार वदे जैसा ॥२२॥

मौंजी चौलादिकीं न भस्म । तदन्यत्र तें परम ।
सनक्षत्रसंध्या परम । हो मध्यम लुप्ततारा ॥२३॥

चाक्षुष सूर्यदर्शन । प्रातःसंध्या अधम जाण ।
ह्याउलट रात्रौ जाण । उपस्थान सूर्येक्षणें ॥२४॥

त्या आधी, आचमन । प्राणायाम मार्जन ।
मंत्राचमन मार्जन । अघमर्षण अर्ध्वदान ॥२५॥

मनस्समाधानें द्या तीन । कालात्यय चौथे जाण ।
सूर्योदयविघ्नकारण । रक्षोगण मरती ह्यांनीं ॥

ह्या दुर्वारास्त्रें मारितां । दोष येतो, भूमी फिरतां ।
असावादित्य जपतां । ये शुद्धता ब्राह्मणासी ॥

हो स्वस्से पानभूत । कर्म कीजे सदोदित ।
शुभासनीं न्यासहित । जपा स्मरत ऋष्यादिक ॥२८॥

जप मोजा अक्षमालेनें किंवा स्फटिकादिकाने ।
निष्फळ तो मुद्राविणें । समाधानें मौनें जपा ॥२९॥

लय भूल पडूं न द्यावी । छन्नमाला न पडावी ।
गायत्री हजार जपावी । कमी योजावे अशक्तत्वें ॥

वृद्धंत्वादि तारत्म्यें । जपिजे न धनकाम्यें ।
उभ्यानें दोन संध्ये । सायंसंध्येसी बसूनी ॥३१॥

उभें रहावें उपस्थानीं । दिशा देव द्विजां नमूनी ।
गुरुपादातें वंदुनि । विसर्जोनी द्यावी संध्या ॥३२॥

हो असा हा संध्याविधी । सायंप्रातर्होमविधी ।
कीजे स्वयें उदया आधीं । प्रादुष्करण मग होम ॥

हा आत्मस्त्री सुतादिकें । कीजे गव्यधान्यादिकें ।
धर्म करितां श्रमदुःखें । नच लेखे चित्ती विप्रा ॥

भोग कः पदार्थ द्विजा । कर्मे होयी शुद्धी निजा ।
आनंदा घे तोचि सहजा । देवपूजा हीच मुख्य ॥

होम असा झाल्यावर । ब्रह्मयज्ञ कीजे बाहेर ।
ब्रह्मांजळी सपवित्र । म्हणा मंत्र ब्राह्मण अंगें ॥३६॥

विद्या हंकारवर्जित । ब्रह्मयज्ञ दे मुक्तता ।
दोष नसें कसें पढतां । जपाल्पता अनध्यायीं ॥३७॥

कोणी वैश्वदेवोत्तर । करिती मध्यसंध्योत्तर ।
तर्पा देवर्षिपितर । सव्य निवीत्य पसव्येसी ॥३८॥

होविश्वात्माऽऽब्रह्मस्तंबांत । तर्पणें तृप्तयवाक्षत ।
देवर्षिलाकरिती तृप्‍त । पितरातृप्‍तकरिती तिला ॥३९॥

गृहीं न हें तिलतर्पण । निंद्यदिनीं मांगल्यीं न ।
दिवाळींत यमतर्पण । भीष्माष्टमीसी ॥४०॥

हें करो जीवत्पिता । दोष अनवश्य करितां ।
मध्यान्हीं सूर्य येतां । मध्यान्हसंध्या कीजे ॥४१॥

इति श्री०प०प०वा०स०वि सारे आन्हिककर्मनिरुपणं नाम षष्‍ट्‌त्रिंशो०


श्री सप्तशती गुरूचरित्र अन्य अध्याय


सप्तशती गुरूचरित्र अध्याय पहिला | Saptashati Gurucharitra Adhyay 1
सप्तशती गुरूचरित्र अध्याय दुसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 2
सप्तशती गुरूचरित्र अध्याय तिसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 3
सप्तशती गुरूचरित्र अध्याय चौथा | Saptashati Gurucharitra Adhyay 4
सप्तशती गुरूचरित्र अध्याय पाचवा | Saptashati Gurucharitra Adhyay 5
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 6
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सातवा | Saptashati Gurucharitra Adhyay 7
सप्तशती गुरूचरित्र अध्याय आठवा | Saptashati Gurucharitra Adhyay 8
सप्तशती गुरूचरित्र अध्याय नववा | Saptashati Gurucharitra Adhyay 9
सप्तशती गुरूचरित्र अध्याय दहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 10
सप्तशती अध्याय अकरावा | Saptashati Adhyay 11
सप्तशती गुरूचरित्र अध्याय बारावा | Saptashati Gurucharitra Adhyay 12

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *