श्री गुरुचरित्र सप्तशती अध्याय सदतीसावा

सप्तशती गुरूचरित्र अध्याय सदतीसावा | Saptashati Gurucharitra Adhyay 37

गृह भूमी संमार्जन । कीजे नित्य लेपरंजन ।
शालग्रामशिला धेनू । गृहीं राखून ठेवा गव्य ॥१॥

गृह त्वादे गृहमेधीय । अग्निहोत्र किंवा गुह्य ।
हो संध्यावत्‌ देवपूज्य । पशुतुल्यत्व अन्यथा ॥२॥

किंवा प्रातर्विस्तरानें । दुपारी पंचोपचारानें ।
सायंकाळीं निरांजनें । आठ स्थानें पूजनाची ॥३॥

जे कोणी न पूजती । ते यमदंड घेती ।
वेदमंत्रे द्विज पूजिती । पौंराणोक्तीं स्त्रीशूद्रादि ॥४॥

विपि नां तोत्थ मध्यम । क्रीत हीन, स्वीय उत्तम ।
तसीं श्वेत रक्त श्याम । पुष्पें अधम शूद्रानीत ॥५॥

न द्या देवा सकृमिछिद्र । दुर्गे दुर्वा, केवडा हरा ।
वर्जा तुळशी गणेश्वरा । धुत्तुरार्कादि कृष्णा ॥६॥

वाम हस्ताकडे कलश । पुष्पादिका दक्षिण देश ।
शंख घंटा वामदक्षिणेस । कीजे न्यास देही देवी ॥७॥

कायें मानसें वाचें द्विजा । षोडशोपचारे पूजा ।
मिळतां पंचामृतें पूजा । स्नानापूर्वीं नंतर भूषा ॥८॥

तवाश्रित मी मला तारीं । म्हणूनी निर्माल्य घे शिरीं ।
भावें मंत्रजप करीं । तीर्थ पी शिरी घे उद्वासी ॥

घे अंतःकरणीं देवा । पंचसूना दोष जावा ।
जरी तरी वैश्वदेवा । प्रातःसायं स्वान्नशुध्यर्थ ॥१०॥

याचे प्रातःकालारंभण । होम करी तो देवयज्ञ ।
हो बळी तो भूतयज्ञ । पितृनृयज्ञ तत्तर्पणें ॥११॥

वीक्षणार्थ अतिथीसी । किंचित् ठरा अंगणदेशीं ।
येतां अन्न द्या शक्तीसी । द्या यतीसी सजलांन्न ॥१२॥

ओले पाद मुखकर । जेवा घेउनी परिवार ।
नेणत्यासी वाढा दूर । नच करा पंक्तिभेद ॥१३॥

घालून चित्राहुति । आपोशन घ्या मौंनस्थिति ।
घ्याव्या मंत्रे प्राणाहुति । पात्र हातीं धरुनिया ॥१४॥

सर्वांस प्राणाहुत्यंत । मौंन पुढें विकल्पित ।
पात्रीं टाका न उच्छिष्ट । जल पितां शब्द वर्ज्य ॥१५॥

दीप मावळतां न खावें । रजस्वलांत्यां न देखावें ।
त्यांचे शब्द न ऐकावें । न शिवावें परस्पर ॥१६॥

दुर्वायु अधो आतां । अन्न त्यजा कीटयुक्ता ।
न जेवावें वांती होतां । केश पडता प्रोक्षुनि घ्यावे ॥१७॥

वियुक्तः स्याद् द्विजत्वात्स । पलांडुलशुनादिभुक् ।
तामसाहारभुग्दुर्धीः । सात्विकाहारभुक्सुधीः ॥१८॥

आज्या पयोन्न लवण । सर्व खावें अन्य अन्न ।
सशेष द्यावें उच्छिष्टान्न आपोशन । अर्धे प्यावें ॥१९॥

मुखाचा शोधनासी । वर्जावें तर्जनीसी ।
मुख हस्ताघ्री शुचीसी । द्विराचमनें बोलीयेलें ॥२०॥

ध्यासम्यक् तांबुलादि । ऐकावें पुराणादि ।
कीजे सायंसध्याविधी । भोजनांदि पूर्ववत्‌ ॥२१॥

क्षीरान्न रात्रीं शस्त । दिवाकर्म प्राक्प्रहरांत ।
रात्रौं वर्जा सौंरपाठ । निशींथांत रात्रिकर्म ॥२२॥

जैं पञ्च यज्ञादिकचुके । कीजेप्रायश्चित्तविवेके ।
सुखशायिनिशां वंदा, सुखें । निजाईशाअर्पूनकर्म ॥२३॥

स्त्रीऋतु कालीं करा रति । पर्व मूल मघा रेवती ।
वर्जा दिवा श्राद्धव्रती । ऋतुगामी ब्रह्मचारी ॥२४॥

न गुर्विणीशीं रमांवें । रतीं कोप द्वेष त्यजावे ।
ऋतु चुकवूनी न जावें । जातां पावे भ्रूणहत्या ॥२५॥

घर धंदा होतांहि विप्रा । न सोडावें निजाचारा ।
गुरु ऐसें कथिती विप्रा । तो आचार करुनि तरे ॥२६॥

इति श्री०प०प०वा०स०वि० सारे आन्हिककर्मनिरुपणं नाम सप्तत्रिंशो०


श्री सप्तशती गुरूचरित्र अन्य अध्याय


सप्तशती गुरूचरित्र अध्याय पहिला | Saptashati Gurucharitra Adhyay 1
सप्तशती गुरूचरित्र अध्याय दुसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 2
सप्तशती गुरूचरित्र अध्याय तिसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 3
सप्तशती गुरूचरित्र अध्याय चौथा | Saptashati Gurucharitra Adhyay 4
सप्तशती गुरूचरित्र अध्याय पाचवा | Saptashati Gurucharitra Adhyay 5
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 6
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सातवा | Saptashati Gurucharitra Adhyay 7
सप्तशती गुरूचरित्र अध्याय आठवा | Saptashati Gurucharitra Adhyay 8
सप्तशती गुरूचरित्र अध्याय नववा | Saptashati Gurucharitra Adhyay 9
सप्तशती गुरूचरित्र अध्याय दहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 10
सप्तशती अध्याय अकरावा | Saptashati Adhyay 11
सप्तशती गुरूचरित्र अध्याय बारावा | Saptashati Gurucharitra Adhyay 12

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *