श्री गुरुचरित्र सप्तशती अध्याय चाळीसावा

सप्तशती गुरूचरित्र अध्याय चाळीसावा | Saptashati Gurucharitra Adhyay 40

एक वेदज्ञ ब्राह्मण । श्वेतकुष्टें व्यापून ।
गुरुप्रति येऊन । म्हणें दीननाथा तारीं ॥१॥

झालों दैवें कुष्टी म्हणून । तोंड हें न पाहती जन ।
ह्यांचें करीं तूं शमन । नातरीं प्राण सोडीन मी ॥२॥

पुरश्वर्यादिकें पाप । न जाता हो उलट ताप ।
देवा तूंची मायबाप । माझें पाप शमवीं हें ॥३॥

आश्वासन देती गुरु । तंव आला एक नर ।
शुष्ककाष्ठ डोईवर । घेवोनि ठरला तो तेथें ॥४॥

अपूर्वैक चमत्कार । करुं इच्छी गुरुवर ।
सांगे विप्रा घे झडकर । संगमावर रोवीं काष्ठा ॥५॥

अविरत सेवीं यासी । पाला येतां शुची होसी ।
द्विज रोवी त्या काष्टासी । सद्भावें जल शिंपी ॥६॥

लोक हसुनि वारिती । नायके तो गुरुप्रती ।
ते येवोनी तें सांगती । गुरु म्हणती भाव फले ॥७॥

अप्रमेय भावफल । धनंजयवाक्यें सुशील ।
लिंगा चिताभस्म दे भिल्ल । एकदां लब्ध न हो भस्म ॥८॥

इच्छी वपू जाळावया । मला जाळी म्हणे भार्या ।
भस्म दे, तिला जाळुनियां । प्रसाद ध्याया आली तीच

तयेवेळीं प्रगटे हर । तया देई इष्ट वर ।
असा भावाचा प्रकार । म्हणूनी गुरु जाती तेथें ॥१०॥

त्या उद्योगातें पाहून । करितीं काष्ठा प्रोक्षण ।
आले अंकूर फुटोन । विप्र स्वर्णवर्ण झाला ॥११॥

बरवे अंकुर फुटले । कुष्ठ सर्व मावळलें ।
द्विजें स्तवना आरंभिलें । तैं उदेले अष्टभाव ॥१२॥

शांतदांत इंदुकोटिकांदीप्त अत्रिनंदना ।
देंववृंदवंद्यपाद दत्त भक्तचित्तरंजना ॥१३॥

पापतप्ततापभंजना सनातना जनार्दना ।
मायिकांधकारसूर्य दत्त भक्तचित्तरंजना ॥१४॥

दत्तकृत्तकामरोष वेषधारि भिक्षु तूं जना ।
इष्ट देसि धर्म पासि दत्त भक्तचित्तरंजना ॥१५॥

राग द्वेष दोष वारिं, तारिं सूर्यचंद्रलोचना ।
भक्तकामधेनु तूंची दत्त भक्तचित्तरंजना ॥१६॥

हस्तिंदण्ड कुंडि घेसि देसि जीव वीतजीवना ।
रक्तपद्मपत्रनेत्र दत्त भक्तचित्तरंजना ॥१७॥

तूंचि विश्वहेतु मंतु सोसि होसि मायबाप ना ।
नित्य शुद्ध बुद्ध मुक्त दत्त भक्तचित्तरंजना ॥१८॥

तूंचि देव योगि होसि नासिं दैन्यदुःखकानना ।
न्यासि होसि कृष्नावासि दत्त भक्तचित्तरंजना ॥१९॥

ब्रह्मवस्तु तूं अनादिमध्यनाश खास वासना ।
वारिं, भक्ति देयिं तारिं दत्त भक्तचित्तरंजना ॥२०॥

तयाचा भाव जाणुनि विप्रा । विद्यासरस्वतीमंत्रा ।
देऊनियां सकलत्रा । राहवि मित्रापरी गुरु ॥२१॥

इति श्री०प०प०वा०स०वि सारे विप्रकुष्ठहरणं नाम चत्वारिंशो०


श्री सप्तशती गुरूचरित्र अन्य अध्याय


सप्तशती गुरूचरित्र अध्याय पहिला | Saptashati Gurucharitra Adhyay 1
सप्तशती गुरूचरित्र अध्याय दुसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 2
सप्तशती गुरूचरित्र अध्याय तिसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 3
सप्तशती गुरूचरित्र अध्याय चौथा | Saptashati Gurucharitra Adhyay 4
सप्तशती गुरूचरित्र अध्याय पाचवा | Saptashati Gurucharitra Adhyay 5
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 6
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सातवा | Saptashati Gurucharitra Adhyay 7
सप्तशती गुरूचरित्र अध्याय आठवा | Saptashati Gurucharitra Adhyay 8
सप्तशती गुरूचरित्र अध्याय नववा | Saptashati Gurucharitra Adhyay 9
सप्तशती गुरूचरित्र अध्याय दहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 10
सप्तशती अध्याय अकरावा | Saptashati Adhyay 11
सप्तशती गुरूचरित्र अध्याय बारावा | Saptashati Gurucharitra Adhyay 12

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *