तो होय गुरुनाथ । तियेप्रति सांगे हित ।
कोण कोणाचा हो सुत । वद ज्ञात असे तर ॥१॥
पृथ्व्यप्तेजोवाताकाश । हेच आले आकारास ।
मायामय संबंधास । तूंचि खास रडशी कीं ॥२॥
जरी सूनू तुझा हाची । पूर्वापर असे साची ।
सांग कथा प्राग्जन्माची । तूं कोणाची स्त्री की माता ॥३॥
जैं सूर्योदयास्तानें । नित्य दिन रात होणें ।
तेवीं कर्में जन्ममरणें । भोगणें सुखदुःख ॥४॥
कोणी नहें निवारिती । गुणमय ते मरती ।
देवादिकां हीच गती । मेला मागुती न ये शोके ॥५॥
दे हा शव जाळावया । ती म्हणे जो दे अभया ।
बाध ये कीं त्याच्या वाक्या । कोण तया पुढें भजे ।
सांगे शांत ब्रह्मचारी । हें जा पूस औदुंबरी ।
येरु शव बांधुनी उदरीं । पादुकेवरी शिर हाणी ॥७॥
बोल कोणाचा ऐकेना । लोक गेले स्वसदना ।
पतिअह ती अंगना । आक्रोशना करीतसे ॥८॥
स्वप्नी नको रडूं म्हणून । स्वामी देती आश्वासन ।
पाहे जगी होवून । पुत्र संजीवन झाला ॥९॥
विप्र पाहांटेस आले । त्यांणीं नवल हें ऐकिलें ।
सर्वां आश्चर्य तें झालें । असें झालें वाणूं किती ॥१०॥
इति श्री०प०वा०स० सारे मृतपुत्रसंजीवनं नाम एकविंशो०
श्री सप्तशती गुरूचरित्र अन्य अध्याय
सप्तशती गुरूचरित्र अध्याय पहिला | Saptashati Gurucharitra Adhyay 1
सप्तशती गुरूचरित्र अध्याय दुसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 2
सप्तशती गुरूचरित्र अध्याय तिसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 3
सप्तशती गुरूचरित्र अध्याय चौथा | Saptashati Gurucharitra Adhyay 4
सप्तशती गुरूचरित्र अध्याय पाचवा | Saptashati Gurucharitra Adhyay 5
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 6
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सातवा | Saptashati Gurucharitra Adhyay 7
सप्तशती गुरूचरित्र अध्याय आठवा | Saptashati Gurucharitra Adhyay 8
सप्तशती गुरूचरित्र अध्याय नववा | Saptashati Gurucharitra Adhyay 9
सप्तशती गुरूचरित्र अध्याय दहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 10
सप्तशती अध्याय अकरावा | Saptashati Adhyay 11
सप्तशती गुरूचरित्र अध्याय बारावा | Saptashati Gurucharitra Adhyay 12