श्री गुरुचरित्र सप्तशती अध्याय एक्कावन्नावा

सप्तशती गुरूचरित्र अध्याय एक्कावन्नावा | Saptashati Gurucharitra Adhyay 51

आतां एथें न रहावें । कलियुगीं गुप्त व्हावें ।
असें म्हणतां गुरुराव । अवघे दुःखित होती तें ॥१॥

गुरु तयां आश्वासून । म्हणे भजती आतां हीन ।
पुढें येतील दुर्दिन । हें जाणून गुप्त राहूं ॥२॥

जे सद्‌बुद्धि असती लोक । दिसो तयांसी सम्यक ।
गाणगापुरीं राहूं भाक । घ्याहो लोक त्रिवाचेसी ॥३॥

भवाध्वा हो तुम्हां सुगम । भजतां पादुका जे काम ।
ते पुरोनि अंतीं धाम । मिळेल नाम माझे गातां ॥४॥

भवांबुधितरणार्थ । भजा मज मिळेल स्वार्थ ।
चरित गाता मनोरथ । पुरती, व्यर्थ चिंता नसो ॥५॥

हो सद्धित पादुकार्चनीं । विघ्नहर चिंतामणी ।
अर्चा प्रातःकृष्णास्नानीं । जाउनि रोज येयीन मी ॥६॥

भक्तिमान्‌ भावी जसा जसा । त्यापाशीं मी तसा तसा ।
गुरुचा हो बोल ऐसा । नामधारका म्हणे सिद्ध ॥७॥

रहस्यार्थ गुरुचरिताचा सिद्धनामधारकाचा । संवाद जो लोकीं साचा ।
सार तयाचा हा चिद्रस ॥८॥

हें सत्कृपा करुनी दत्त । वदवी प्रेरुंनियां चित्त ।
तया पदीं हा समस्त । समर्पित असो ग्रंथ ॥९॥

इति श्री०प०वा०स०वि० सारे वरप्रदानं नाम एकपंचाशत्तमो०

॥ इति श्रीसप्तशतीगुरुचरित्रं समाप्तं ॥


श्री सप्तशती गुरूचरित्र अन्य अध्याय


सप्तशती गुरूचरित्र अध्याय पहिला | Saptashati Gurucharitra Adhyay 1
सप्तशती गुरूचरित्र अध्याय दुसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 2
सप्तशती गुरूचरित्र अध्याय तिसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 3
सप्तशती गुरूचरित्र अध्याय चौथा | Saptashati Gurucharitra Adhyay 4
सप्तशती गुरूचरित्र अध्याय पाचवा | Saptashati Gurucharitra Adhyay 5
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 6
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सातवा | Saptashati Gurucharitra Adhyay 7
सप्तशती गुरूचरित्र अध्याय आठवा | Saptashati Gurucharitra Adhyay 8
सप्तशती गुरूचरित्र अध्याय नववा | Saptashati Gurucharitra Adhyay 9
सप्तशती गुरूचरित्र अध्याय दहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 10
सप्तशती अध्याय अकरावा | Saptashati Adhyay 11
सप्तशती गुरूचरित्र अध्याय बारावा | Saptashati Gurucharitra Adhyay 12

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *