श्री गुरुचरित्र सप्तशती अध्याय अठ्ठेचाळीसावा

सप्तशती गुरूचरित्र अध्याय अठ्ठेचाळीसावा | Saptashati Gurucharitra Adhyay 48

जो हो वेदां अगोचर । तो भक्तां हो सुगोचर ।
तया ग्रामीं भक्त शूद्र । नमस्कार करी नित्य ॥१॥

गुरुदेव संगमीं जाती । त्या पाहून करी प्रणती ।
पुनः ये तो येणें रीती । करी भक्ती शेतीकरितां ॥२॥

लोकी चमत्कार करावया । शूद्रा वदे गुरुराया ।
कच्चें पीका हें कापुनियां । टांकी मध्यान्हापावेतों ॥३॥

तो तें प्रमाण मानून । स्वामिमागा ठरवून ।
कापी, तत्स्त्री येऊन । करी विघ्न तरी न हटे ॥४॥

ते कथिती अधिकार्‍यासी । शूद्र न जुमानीं त्यासी ।
दावी मध्यान्हीं गुरुसीं । म्हणे शेतासी कापिलें

तूं अतःपर काय खासी । असें गुंरु पुसे त्यासी ।
म्हणे तुझ्या प्रसादेसी । लाभ आम्हासी होईल ॥

त्याचे पुरवाया हेत । वृष्टी मूलर्क्षी पाडित ।
शतगुण त्या शेतांत । गुरुनाथ धान्य देती ॥७॥

तो करुनि क्षेत्रपपूजा । सस्त्रीक करी गुरु पूजा ।
स्वामीभाग देउनि द्विजां । धान्यपुंजा वाटी हर्षे ॥८॥

संतोषोनी गुरुमूर्ति । त्यांच्या वंशा गती देती ।
अशा लीला केल्या किती । त्यातें नेणती ब्रह्मादिक ॥

इति श्री०प०प०वा०स०वि सारे शूद्रधान्यप्रवृद्धिवर्णनं नाम अष्टचत्वारिंशो०


श्री सप्तशती गुरूचरित्र अन्य अध्याय


सप्तशती गुरूचरित्र अध्याय पहिला | Saptashati Gurucharitra Adhyay 1
सप्तशती गुरूचरित्र अध्याय दुसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 2
सप्तशती गुरूचरित्र अध्याय तिसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 3
सप्तशती गुरूचरित्र अध्याय चौथा | Saptashati Gurucharitra Adhyay 4
सप्तशती गुरूचरित्र अध्याय पाचवा | Saptashati Gurucharitra Adhyay 5
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 6
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सातवा | Saptashati Gurucharitra Adhyay 7
सप्तशती गुरूचरित्र अध्याय आठवा | Saptashati Gurucharitra Adhyay 8
सप्तशती गुरूचरित्र अध्याय नववा | Saptashati Gurucharitra Adhyay 9
सप्तशती गुरूचरित्र अध्याय दहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 10
सप्तशती अध्याय अकरावा | Saptashati Adhyay 11
सप्तशती गुरूचरित्र अध्याय बारावा | Saptashati Gurucharitra Adhyay 12

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *