सत्यसंकल्प दे तसें । स्वयें अवतरतसे ।
कुरुपुरीं भेटतसे । ऐक असे विप्र एक ॥१॥
करी गरीब तो व्यापार । लाहे नवसें द्रव्य फार ।
यात्रे जातां मार्गी चोर । तया ठार मारिती ॥२॥
श्रीश शस्त्रें मारी चोरां । जीववी द्विजवरा ।
राखी एका सभ्य चोरा । स्वयें गुप्त हो श्रीपाद ॥३॥
ते शस्त्रे मेले त्यांतें । द्विज जाणोनी धनांतें ।
घेऊनी ये कुरुपुरातें । दें नवस हो कृतार्थ ॥४॥
इति श्री०प०प०वा०स०वि०स० मृतविप्रसंजीवनं नाम दशमो०
श्री सप्तशती गुरूचरित्र अन्य अध्याय











