श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय अकरावा

सप्तशती अध्याय अकरावा | Saptashati Adhyay 11

ब्राह्मण स्त्री करंजपुरीं । हो अंबारव्या सुंदरी ।
प्राक्संस्कारें प्रदोष करी । तिला वरी माधव विप्र ॥१॥

झाली दृढधी गर्भिणी । बोले तत्वज्ञान जनीं ।
शोभली ती संस्कारानीं । शुभलग्नीं प्रसवली ॥२॥

तो पढें बाळ ओंकार । पिता करी तत्संस्कार ।
होती सर्व हृष्टतर । अवतार हा म्हणती ॥३॥

करुन नामकर्मा । नाम घेती नृहरिशर्मा ।
पिता वेंची धन धर्मा । चित्र नर्मा दावी बाळ ॥४॥

न इच्छि शिंशु बोलाया । तया मूक मानूनियां ।
ते करितीं बहु उपाया । शिशु तयां दावी खुणा ॥५॥

मूकत्वा टाकी तेव्हां । बांधाल मुंजी जेव्हां ।
असें म्हणूनी करी तेव्हां । बाल लोहाचें सुवर्ण ॥६॥

बोल तयाचा मानून । करिती व्रतबंधन ।
मातेपाशीं भिक्षा दान । मागे तीन वेद पढे ॥७॥

जैं प्रातःकाल येतां । अंधःकार जाय अस्ता ।
तेवीं बाळें वेद पढतां । मर्त्यताधी लोपली ॥८॥

सर्वां परम हर्ष झाला । बटू प्रार्थी मातेला ।
स्वीकारुं संन्यासाला । होती तुला पुत्र पुत्री ॥९॥

माता दंभोलीपातसे । ऐकतांची पडतसे ।
सांवरोनी बोलतसे । क्रम असे संन्यासासी ॥१०॥

वेदांत ब्रह्मचर्यादि । क्रम असे नच आधीं ।
अन्यथा पडे मधीं । पुत्र सुधी ऐक म्हणे ॥११॥

इति श्री०प०प०वा०स० नृसिंहावतारो नाम एकादशो०


श्री सप्तशती गुरूचरित्र अन्य अध्याय


सप्तशती गुरूचरित्र अध्याय पहिला | Saptashati Gurucharitra Adhyay 1
सप्तशती गुरूचरित्र अध्याय दुसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 2
सप्तशती गुरूचरित्र अध्याय तिसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 3
सप्तशती गुरूचरित्र अध्याय चौथा | Saptashati Gurucharitra Adhyay 4
सप्तशती गुरूचरित्र अध्याय पाचवा | Saptashati Gurucharitra Adhyay 5
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 6
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सातवा | Saptashati Gurucharitra Adhyay 7
सप्तशती गुरूचरित्र अध्याय आठवा | Saptashati Gurucharitra Adhyay 8
सप्तशती गुरूचरित्र अध्याय नववा | Saptashati Gurucharitra Adhyay 9
सप्तशती गुरूचरित्र अध्याय दहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 10
सप्तशती गुरूचरित्र अध्याय बारावा | Saptashati Gurucharitra Adhyay 12
सप्तशती गुरूचरित्र अध्याय तेरावा | Saptashati Gurucharitra Adhyay 13

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *