श्री गुरुचरित्र सप्तशती अध्याय विसावा

सप्तशती गुरूचरित्र अध्याय विसावा | Saptashati Gurucharitra Adhyay 20

ऐसें परिसुनी विप्र । म्हणे तेथें कोणा वर ।
लाधला बोला सविस्तर । ऐकें उत्तर सिद्ध म्हणे ॥१॥

एक दशग्रंथी विप्र । शिरोळग्रामीं मृतपुत्र ।
तद्भार्येसी एक विप्र । सांगे उग्रकर्मविपाक ॥२॥

त्वां ब्रह्मस्वशत घेतलें । तया पिशाचत्व आलें ।
त्याणें तुझे सुत मारिले । कर्म केलें पाहिजे त्याचें ॥३॥

दे द्रव्य दद्गोत्रासी । सेवीं मास एक गुरुसी ।
येरु म्हणे न मजपाशीं । द्रव्य गुरुसी सेवीं भावें ॥४॥

अभयंकर रक्षु ऐसें । म्हणूनी सेवितसे ।
स्वप्नीं भूत मारीतसे । राखीतसे गुरु तिसी ॥५॥

सांगे तत् परिहार जसा । जागेंपणें करी तसा ।
तेणें मुक्त झाला पिसा । गुरु प्रसाद दे तिला ॥६॥

ती दोन पुत्र प्रसवे । ते दोघे दिसती बरवें ।
थोर होतां व्रत करावें । म्हणुनी वेचिती ते द्रव्य ॥७॥

श्रेष्ठ तनयाचें व्रत । आरंभिता धनुर्वात ।
होवोनि तो वांकत । सन्निपात न शमें यत्‍नें ॥८॥

तो तद्भावें फिरवी नेत्र । मरे होतां अर्धरात्र माता रडे पिटी गात्र ।
बोधमात्र नायके ती ॥९॥

दिवस मध्यान्हीही येतां । जाळाया ती न दे प्रेता ।
ब्रह्मचारी स्पष्टवक्ता । तेथें येतां झाला तेव्हां ॥१०॥

इति श्री०प०प०वा०स०गु० समंधपरिहारो नाम विंशो०


श्री सप्तशती गुरूचरित्र अन्य अध्याय


सप्तशती गुरूचरित्र अध्याय पहिला | Saptashati Gurucharitra Adhyay 1
सप्तशती गुरूचरित्र अध्याय दुसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 2
सप्तशती गुरूचरित्र अध्याय तिसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 3
सप्तशती गुरूचरित्र अध्याय चौथा | Saptashati Gurucharitra Adhyay 4
सप्तशती गुरूचरित्र अध्याय पाचवा | Saptashati Gurucharitra Adhyay 5
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 6
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सातवा | Saptashati Gurucharitra Adhyay 7
सप्तशती गुरूचरित्र अध्याय आठवा | Saptashati Gurucharitra Adhyay 8
सप्तशती गुरूचरित्र अध्याय नववा | Saptashati Gurucharitra Adhyay 9
सप्तशती गुरूचरित्र अध्याय दहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 10
सप्तशती अध्याय अकरावा | Saptashati Adhyay 11
सप्तशती गुरूचरित्र अध्याय बारावा | Saptashati Gurucharitra Adhyay 12

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *