होते मंदधीब्राह्मण । म्लेच्छराजापुढें येऊन ।
सार्थवेद म्हणून । घेती धन उन्मत्त ते ॥१॥
म्लेच्छा मदोन्मत्त विप्र । म्हणती आज्ञा द्यावी क्षिप्र ।
वादें जिंकूं लोकीं विप्र । हारिपत्र किंवा घेवूं ॥२॥
राव महानंदे देत । आज्ञा बसवी पालखीत ।
विप्र राजे म्हणवीत । भूमी जिंकित येती तेथ ॥३॥
ते कुमसी मध्यें यती । त्रिविक्रमभारती ।
त्रिवेदी जाणुनियां येती । त्या म्हणती वाद करीं ॥४॥
जरी मैत्रद्विज असे । तरी करील कीं असें ।
कुबुद्धि हे विप्र जसे । हरती तसें करावें ॥५॥
यांची वांछा गुरु पुरवील । असें म्हणोनी त्यां तत्काळ ।
यती आणी गुरुजवळ । सांगे सकळत्रिविक्रम ॥६॥
वाद्यां शोधीत हे आले । यांणीं माझें न ऐकिलें ।
मग येथें आणिले । या शिक्षिले पाहिजेत ॥७॥
गुरुजी म्हणती तया । नेणो आम्ही जयाऽजया ।
वाद आम्हाम कासया । तुम्हीं वाया मरुं नका ॥८॥
विप्र वचन बोलती । तुम्हां काय विद्या येती ।
तें ऐकूनि गुरु म्हणती । गर्व किती करितां हा ॥९॥
गर्वे लोकीं किती मेले । बाण रावण खपले ।
व्यर्थ कौरवादी मेले । आरंभिलें काय हें तुम्हीं ॥१०॥
इति श्री०प०प०वा०स०वि० सारे उन्मत्तद्विजाख्यानं नाम पंचविशो०
श्री सप्तशती गुरूचरित्र अन्य अध्याय
सप्तशती गुरूचरित्र अध्याय पहिला | Saptashati Gurucharitra Adhyay 1
सप्तशती गुरूचरित्र अध्याय दुसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 2
सप्तशती गुरूचरित्र अध्याय तिसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 3
सप्तशती गुरूचरित्र अध्याय चौथा | Saptashati Gurucharitra Adhyay 4
सप्तशती गुरूचरित्र अध्याय पाचवा | Saptashati Gurucharitra Adhyay 5
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 6
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सातवा | Saptashati Gurucharitra Adhyay 7
सप्तशती गुरूचरित्र अध्याय आठवा | Saptashati Gurucharitra Adhyay 8
सप्तशती गुरूचरित्र अध्याय नववा | Saptashati Gurucharitra Adhyay 9
सप्तशती गुरूचरित्र अध्याय दहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 10
सप्तशती अध्याय अकरावा | Saptashati Adhyay 11
सप्तशती गुरूचरित्र अध्याय बारावा | Saptashati Gurucharitra Adhyay 12