श्री गुरुचरित्र सप्तशती अध्याय अठ्ठाविसावा

सप्तशती गुरूचरित्र अध्याय अठ्ठाविसावा | Saptashati Gurucharitra Adhyay 28

जो दूरी त्यजी धर्मास । मायाबापदेवगुरुस ।
निर्दोष स्त्रीपुत्रास । चोर असत्यवादी जो ॥१॥

जो निरंतर अशुद्ध । हरिहरां करी भेद ।
हो पाखंड दुर्वाद । पंक्तिभेद करी खळ ॥२॥

मारी यत्‍नें जीवा क्रूर । जाळी वनग्रामघर ।
विकी कन्या गोरस मंत्र । फिरवी विप्रअतिथीतें ॥३॥

जो निंदक श्राद्धातें । न करी फोडी कूपांतें ।
तोडी मार्गाश्रयवृक्षातें । जेवी व्रतातें सोडून ॥४॥

जो दिवापर्वणीं स्त्रीशीं । भोगी रमे परस्त्रीसी ।
करी विश्वासघातासी । दत्तदानासी घे पुनः ॥५॥

जो स्वप्नोपमसुखार्थ । मारणादि करी व्यर्थ ।
परतापी करी अनर्थ । नाडी नेणत दे औषध ॥६॥

तो पतित होयी मांग । जो करी वृषलीसंग ।
करी स्नानसंध्यांत्याग । पंचयाग टाकून जेवी ॥७॥

जो होय वृत्तिरत्‍नहर्ता । दुष्प्रतिग्रही दुर्भोक्ता ।
मद्य पीतां ये हीनता । अनुतप्ता दोष थोडा ॥८॥

जो लुच्चा जिती विप्रात । हूं तूं करी पितृगुरुंस ।
तो होयी ब्रह्मराक्षस । हो वायस निर्मंत्राशी ॥९॥

तो कप्युदरीं जन्म घे । चोरुनि जो फळपत्र घे ।
जो धन चोरुनि घे । जन्म घे तो उंटाचें ॥१०॥

हो उत्क्रान्तीनंतर । नरकवास घोर ।
ह्या योनी त्या नंतर । दंभकर बगळा हो ॥११॥

माशी मधुहर उंदीर । धान्यहर जळहर ।
चातक पशु तृणहर । स्वर्णहर कृमिकीट ॥१२॥

दुर्गती आधीं भोगून । होतां पुण्यपाप समान ।
अंधपंग्वाद्यघचिन्ह । ये घेऊन येथें पुन्हां ॥१३॥

कृमीश्व खर जारकर्मे । स्त्री नरां गती हे दुष्कर्में ।
जे वागती सत्कर्मे । स्वधर्में तरती ते ॥१४॥

हो परःस्पर दंपती । दोषी ऐसें गुरु बोलती ।
पुसे त्रिविक्रम निष्कृती । सांगती गुरु तया ॥१५॥

तरी गृहीत ब्रह्मदंड । शरण विप्रां पापखंड ।
हो होता पाप उदंड । कृच्छ्रमुंडपूर्वक कीजे ॥१६॥

शक्तिहीनें गोधन द्यांवे । जप यात्रा होम करावे ।
शक्तें चांद्रायण करावें । गव्य प्यावें अनुतापें ॥१७॥

स्वात्मत्वैश्वर्ययुक्त । गुरु वारी सर्व दुरित ।
पितृत्यागें हो पतित । होई पूत मासस्नानें ॥१८॥

पतितानें ते ऐकून । म्हटलें मी झालो पावन ।
घ्या विप्रांत मेळवून । ते ऐकून गुरु म्हणे ॥१९॥

होऊनि नृप विश्वामित्र । सायासें झाला पवित्र ।
तूं हीन वेदापात्र । ये परत्र विप्रकुळीं ॥२०॥

तो आसंन येतां स्त्रीला । स्पर्शभयें मारुं आला ।
गुरु म्हणे त्यजीन स्त्रीला । तो म्हणाला हीन होउं कीं ॥

तेतया अंगींची विभूती । लुब्धा हातीं धुवविती ।
ज्ञान जाउनी त्या ये भ्रांति । घरा प्रति गेला सस्त्रीका ॥

प्रणति करी त्रिविक्रम । म्हणे वारा माझा भ्रम ।
अंग धूता ज्ञान उत्तम । जाउनी भ्रम त्या हो केंवी ॥२३॥

इति श्री०प०प०वा०स० सारे कर्मविपाककथनं नामअष्टाविंशो०


श्री सप्तशती गुरूचरित्र अन्य अध्याय


सप्तशती गुरूचरित्र अध्याय पहिला | Saptashati Gurucharitra Adhyay 1
सप्तशती गुरूचरित्र अध्याय दुसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 2
सप्तशती गुरूचरित्र अध्याय तिसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 3
सप्तशती गुरूचरित्र अध्याय चौथा | Saptashati Gurucharitra Adhyay 4
सप्तशती गुरूचरित्र अध्याय पाचवा | Saptashati Gurucharitra Adhyay 5
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 6
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सातवा | Saptashati Gurucharitra Adhyay 7
सप्तशती गुरूचरित्र अध्याय आठवा | Saptashati Gurucharitra Adhyay 8
सप्तशती गुरूचरित्र अध्याय नववा | Saptashati Gurucharitra Adhyay 9
सप्तशती गुरूचरित्र अध्याय दहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 10
सप्तशती अध्याय अकरावा | Saptashati Adhyay 11
सप्तशती गुरूचरित्र अध्याय बारावा | Saptashati Gurucharitra Adhyay 12

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *