ऐकें ईश्वर प्रभाव । नंदिनाम एक भूदेव ।
कुष्ठें व्यापुंनि घे धांव । देवीपाशी तुळजापुरीं ॥१॥
त्या ईश्वरीजा गुरुपाशीं । म्हणें, तो बोलेकां नरापशीं ।
धाडिसी, मग भोपे यांसीं । सांगून त्यांसी घालविलें
धी पुरःसर नावडता । तो ये भेटे गुरुनाथा ।
गुरु म्हणे तूं कां आतां । आलास रे नरापाशीं ॥३॥
स्वकीय खूण ओळखून । तो प्रार्थी त्या देव मानून ।
गुरु मह्णे पापें करुन । कुष्ठें व्यापून गेलासी ॥४॥
अकस्मात् पाप हो दूरी । या संगमीं स्नान तूं करीं ।
म्हणोनी त्याबरोबरीं । सोमनाथासी धाडिती ॥५॥
तो त्याक्षणीं स्नान करी । अश्वत्था प्रदक्षिणा करीं ।
मठीये त्या अवसरीं । पाहें शरीरीं गुरु म्हणे ॥६॥
शरीर त्याचे दिव्य झालें । किंचित् जंघेसी राहिलें ।
पुसे कुष्ठ हें कां राहिलें । गुरुबोले विकल्पानें ॥७॥
त्वांजीमनुष्यधी धरिली । तीच तूज आड आली ।
माझी स्तुती करीं भली, म्हणेतोलिखितही नेणे ॥८॥
विभूती मग जिव्हेवर । टाकूनी, गुरु म्हणे स्तोत्र ।
करीं, मग तो होयी धीर । करी स्तोत्र श्रीगुरुचें ॥९॥
आत्मा तो तूं सर्वाधीश । शुद्ध बुद्ध नित्य त्रीश ।
तुला नेणुनि कर्मपाशें । बद्ध होती जीव अज्ञाने ॥१०॥
ते अहंकारें त्रिविध । पापें, घेती योनी विविध ।
समपापपुण्यें त्रिविध । नर होती रक्तरेतें ॥११॥
गर्भी महाकष्ट भोगी । सोडवाया प्रार्थी विरागी ।
उपजतां वेगीं । पुढें भोगी होउनि मरे ॥१२॥
त्वद्वीक्षणा विना कैसा । मोक्षा जाईल हा पिसा ।
तूंची कृपा करी ऐसा । प्रार्थीमानसां स्थिरावून ॥
गेलें राहिलेलें कुष्ठ । जहाला तो गुरुप्रेष्ठ ।
कविता करी कविश्रेष्ठ । एकनिष्ठ गुरुपदीं ॥१४॥
इति श्री०प०प०वा०स०वि सारे ब्राह्मणकुष्ठनिवारणं नाम पंचचत्वारिंशो०
श्री सप्तशती गुरूचरित्र अन्य अध्याय
सप्तशती गुरूचरित्र अध्याय पहिला | Saptashati Gurucharitra Adhyay 1
सप्तशती गुरूचरित्र अध्याय दुसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 2
सप्तशती गुरूचरित्र अध्याय तिसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 3
सप्तशती गुरूचरित्र अध्याय चौथा | Saptashati Gurucharitra Adhyay 4
सप्तशती गुरूचरित्र अध्याय पाचवा | Saptashati Gurucharitra Adhyay 5
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 6
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सातवा | Saptashati Gurucharitra Adhyay 7
सप्तशती गुरूचरित्र अध्याय आठवा | Saptashati Gurucharitra Adhyay 8
सप्तशती गुरूचरित्र अध्याय नववा | Saptashati Gurucharitra Adhyay 9
सप्तशती गुरूचरित्र अध्याय दहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 10
सप्तशती अध्याय अकरावा | Saptashati Adhyay 11
सप्तशती गुरूचरित्र अध्याय बारावा | Saptashati Gurucharitra Adhyay 12