परतंत्र न रहावें । धवासवें सतीनें जावें ।
पदोपदीं मेघफल घ्यावें । स्थान घ्यावें पतिलोकीं ॥१॥
किंवा विधवाधर्म । पाळितां ही ये शर्म ।
पोर असतां कीजे भर्म । राहिजे ब्रह्मचार्यापरी ॥२॥
स्वल्प मूलही असतां । पोटीं गर्भ असतां ।
पतिशव न मिळतां । सवें जाता दोष असे ॥३॥
ज्या मूढा केश राखती । धवासह त्यां हो दुर्गती ।
अतएव मरता पति । करो ती केशवपन ॥४॥
शयना तें खाटेवरी । जी करी जाय ती नारी ।
नरकीं यास्तव भूमिवरी । निजो नारी एकाहारा ॥५॥
भूषानु लेप तांबूल । त्यजुनी राखीजे शील ।
नेसावे शुभ्र चैल । मंगलस्नान वर्जावे ॥६॥
विष्णु पतिसम मानून । कीजे वैधव्य आचरण ।
न कीजे नरवीक्षण । चांद्रायण शक्त्या कीजे ॥७॥
अवश्यं भावि होईजे । त्याचा शोक नच कीजे ।
मासव्रत पाळिजे । माघ ऊर्ज वैशाखीं हो ॥८॥
सुमति जी वागे ऐसी । सहगमनवत् फल तीसी ।
जायी घेउनी पतिसी । स्वर्गीं ऐसी गुरुक्ती हे ॥९॥
म्हणे पतिव्रता मातें । वैधव्य हें न रुचतें ।
तारुण्य हें विघ्नातें । देई असें माते वाटे ॥१०॥
अवश्यं कुरु ऐसे । बोलुनी तो देतसे ।
चार अक्ष भस्म परीसें । म्हणतसे त्या सतीतें ॥११॥
हे भूति शिरीं लावून । पतीकर्णी अक्ष बांधून ।
गुरुदर्शन घेऊन । सहगमन करीं मग ॥१२॥
तो आज्ञा अशी देवुन । गेला, साध्वी दानें देऊन ।
पतिशवा नेववुन । अग्नि घेऊन पुढें चाले ॥१३॥
पाहुन नारी म्हणती । केश साडेतीन कोटी ।
होमुनी स्वर्गी घे ती । वर्षकोटी प्रतिकेशा ॥१४॥
सर्व चमत्कार पाहाती । स्मशानी ये मंदगती ।
अग्नि सिद्ध करोनी ती । आठवी चित्तीं उपदेशा ॥
स्वचक्षुनें गुरु पाहून । म्हणे सहगमन करीन ।
विप्रें शीघ्र ये म्हणून । वदताम मनस्विनी गेली ॥१६॥
जै उषःकाळी विजन । गजबजती तैसे जन ।
सवें येती गजबजून । गुरुस्तवन मार्गी करी ॥१७॥
सती यतीशा पाहून । करी साष्टांग नमन ।
पंचपुत्रा हो म्हणून । आशीर्वचन दे गुरु ॥१८॥
हें स्वतंत्र बोलतां जन । देती साद्यंत सांगून ।
गुरु प्रेता आणवून । करी स्नपन रुद्रतीर्थें ॥१९॥
तव तो उठोनी बैसला । नग्न म्हणूनी लाजला ।
सर्व लोकां हर्ष झाला । न मावला साध्वी देही ॥२०॥
दैवयोगे स्वर्णघट । रंका मिळतां अवचट ।
हर्ष हो तेवी तिला स्पष्ट । उत्कट हो हर्ष तेव्हां ॥२१॥
प्रेमागिरा दोघें स्तविती । श्रीगुरु वर देती ।
गेले दोष ये सद्गती । लोहां गती जेवी परीसे ॥२२॥
लिहीन याला विधी लेख । धूर्त पुसे गुरु म्हणे ऐक ।
पुढचा शतायुष्यलेख । दिल्हा सम्यक मागून मी ।
मनश्वैत्य गुरु असें बोले । लोकीं जय शब्द केले ।
दंपतीनें स्नान केले । मठी आले गुरु त्यासह ॥२४॥
इति श्री०प०प०वा०स०वि० प्रेतसंजीवनं नाम द्वात्रिशो०
श्री सप्तशती गुरूचरित्र अन्य अध्याय
सप्तशती गुरूचरित्र अध्याय पहिला | Saptashati Gurucharitra Adhyay 1
सप्तशती गुरूचरित्र अध्याय दुसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 2
सप्तशती गुरूचरित्र अध्याय तिसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 3
सप्तशती गुरूचरित्र अध्याय चौथा | Saptashati Gurucharitra Adhyay 4
सप्तशती गुरूचरित्र अध्याय पाचवा | Saptashati Gurucharitra Adhyay 5
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 6
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सातवा | Saptashati Gurucharitra Adhyay 7
सप्तशती गुरूचरित्र अध्याय आठवा | Saptashati Gurucharitra Adhyay 8
सप्तशती गुरूचरित्र अध्याय नववा | Saptashati Gurucharitra Adhyay 9
सप्तशती गुरूचरित्र अध्याय दहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 10
सप्तशती अध्याय अकरावा | Saptashati Adhyay 11
सप्तशती गुरूचरित्र अध्याय बारावा | Saptashati Gurucharitra Adhyay 12