श्री गुरुचरित्र सप्तशती अध्याय त्रेचाळीसावा

सप्तशती गुरूचरित्र अध्याय त्रेचाळीसावा | Saptashati Gurucharitra Adhyay 43

दे पुरुषार्थ नरांसी । भाद्रशुक्लचतुर्दशीसी
चौदा ग्रंथी रक्तसूत्रासी । बांधीं करासी पूजुनी ॥१॥

संतोष मानुनि तो पुसे । व्रत कोणीं हें केलें कसें ।
गुरु म्हणे द्यूतीं घेतसे । पार्थराज्यदुर्योधन ॥२॥

अभास्त्व पावुनि पांडव । वनीं श्रमतां ये माधव ।
त्याला द्याया स्ववैभव । सांगे देव अनंतव्रत ॥३॥

त्वदन्यः कोनंत इति । पुसतां म्हणे मीच श्रीपती ।
ऐकें, सुमंतुकन्या होती । सुशीला ती पूर्वस्त्रीजा ॥

तीहो पत्‍नी कौंडिण्याची । सापत्‍न माता द्वेषी तिची ।
अन्यत्र न्हे तिला तोची । अनंताची पूजा घेती ॥

देवरवि श्री अनंत । वशीकारभयें अग्नींत ।
दोरा टाकी मुनी कुपित । दुःखाब्धींत पडे तेव्हां ॥६॥

देव माझेवर रुसला । म्हणून मुनी वनीं गेला ।
निर्वाणें तो मूर्च्छित पडला । त्या भेटीला श्रीमदनंत ॥७॥

जीवा त्मेशा भिन्नत्वेंशी । स्तुती करितां त्या ऋषीसी ।
वर दे सवैंश्वरर्येंसीं । तत्पृष्टांशा देयी मोक्ष ॥८॥

त्या अत्युदार अनंत । पुनर्वस्वृक्ष करित ।
म्हणोनी कृष्ण हें व्रत । करवीत पार्थाकरवीं ॥९॥

दायादादिकां मारुन । सार्वभौम धर्म होऊन ।
देहासह स्वर्गी जाण । गेला म्हणून करी तूं व्रत ॥१०॥

विप्र हृष्टतर होऊन । गुरुक्त तें हो व्रत करुन ।
राहे गुरुला सेवून। बंध तोडून मुक्त झाला ॥११॥

तूं अंतःकरणीं जाण । गुरुप्रसादे हो पूर्ण ।
तुमच्या वंशीं म्हणून । तुझें मन रंगलें हें ॥१२॥

याग योगादिकांवीण । तुम्हां जोडे हेंचि निधान ।
असे घेती भक्ती करुन । देवा करुन अपुलासा ॥१३॥

इति श्री०प०प०वा०स०वि० सारे अनंतव्रतकथनं नाम त्रिचत्वारिंशो०


श्री सप्तशती गुरूचरित्र अन्य अध्याय


सप्तशती गुरूचरित्र अध्याय पहिला | Saptashati Gurucharitra Adhyay 1
सप्तशती गुरूचरित्र अध्याय दुसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 2
सप्तशती गुरूचरित्र अध्याय तिसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 3
सप्तशती गुरूचरित्र अध्याय चौथा | Saptashati Gurucharitra Adhyay 4
सप्तशती गुरूचरित्र अध्याय पाचवा | Saptashati Gurucharitra Adhyay 5
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 6
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सातवा | Saptashati Gurucharitra Adhyay 7
सप्तशती गुरूचरित्र अध्याय आठवा | Saptashati Gurucharitra Adhyay 8
सप्तशती गुरूचरित्र अध्याय नववा | Saptashati Gurucharitra Adhyay 9
सप्तशती गुरूचरित्र अध्याय दहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 10
सप्तशती अध्याय अकरावा | Saptashati Adhyay 11
सप्तशती गुरूचरित्र अध्याय बारावा | Saptashati Gurucharitra Adhyay 12

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *