श्री गुरुचरित्र सप्तशती अध्याय एक्केचाळीसावा

सप्तशती गुरूचरित्र अध्याय एक्केचाळीसावा | Saptashati Gurucharitra Adhyay 41

निरहंकार त्वत्पूर्वज । सायंदेव कथिला तूज ।
गाणगापुरीं वसे निज । गुरुराज साक्षाद्देव ॥१॥

हीतद्वार्ता परिसून । ये घालित लोटांगणा ।
देवा पाहतां हो तल्लिन । करी स्तवन प्रेमरसे ॥२॥

गुरु विचारिती क्षेम । येरु सांगे धरुनी प्रेम ।
भवत्सेवाकांम । धरुनी, धाम सोडियेलें ॥३॥

घ्यावीमौजभक्तिरसाची । असी इच्छा हे मनाची ।
गुरु म्हणे सेवा आमुची । कठीणसाची नेणसी तूं ॥४॥

कधीं पुरामध्यें वास । ग्रामीं वनीं नदीतीरास ।
तुला होती कष्ट सायास । कां तूं त्रास पतकरसी ॥५॥

तो करुनी अंगिकार । राहे गुरुच्या बरोबर ।
त्याला एकला बाहेर । संगमावर न्हेति गुरु ॥६॥

जो दोषौ घा स्मरणें हरी । तो संकटी त्यजि कीं हरी ।
हार्दे शिष्य परिक्षा करी । आज्ञा करी मेघा वर्षूं ॥७॥

तेव्हां लोटुनी टांकी वारा । वर्षे मेघ मोठया धारा ।
द्विजें सांहुनी वृष्टी वारा । रक्षिलें वस्त्राश्रये देवा ॥८॥

गुरु केवल परीक्षार्थ । अग्नि आणावया धाडित ।
विद्युत्तेजें ये गांवांत । अग्नि भांडयांत घेऊन ये ॥९॥

प्रत्यक्ष पथिं सर्पां देखे । पळतां, मठीं ध्वनी ऐके ।
प्रकाश देखे मनीं ठके । येउनि देखे एका देवा ॥१०॥

सर्प रक्षार्थ धाडिले । तुझें मन वायां भ्यालें ।
कठिण सेवा हें कळलें । साहस केलें त्वा गुरु म्हणे ॥११॥

हो पश्चत्ताप कीं तुला । द्विज म्हणे देवा मला ।
जाणसी, मी काय तुला । सांगूं मला न दवडीं ॥१२॥

प्रत्यक्ष तूं ब्रह्मनिधान । गुरुसेवेचें विधान ।
सांगा तेणें स्थिर होईन । तें ऐकून गुरु सांगे ॥१३॥

कुमार त्वष्ट्रदेवाचा । विद्यार्थी हो गुरुचा ।
भाव पहावया त्याचा । गुरु साचा वदे तया ॥१४॥

करी एक गृह निर्माण । जें न तुटे नोहे जीर्ण ।
करी वृष्टयादि निवारण । तें ऐकुन तत्स्त्री बोले ॥१५॥

न शिंवली न विणली । अंगाबरोबर भली ।
अशी रम्य दे मज चोळी । त्यावेळीं तत्सुत बोले ॥१६॥

माझ्या चरणा सुख देती । खात न लागे, मनोगती ।
दे पादुका जळींन बुडती । गुरुकन्या तीही बोले ॥१७॥

हों अक्षयैकस्तंभघर । न हो पात्रीं पाक गार ।
काजळ न लागे त्यावर । दे सुंदर कुंडलें हीं ॥१८॥

कुमार तो स्विकारुन । त्यां वंदून धरी रान ।
तेथें अवधूत येऊन । म्हणे कां म्लान मुख तुझें ॥१९॥

मनस्समाधान करुन । बाळ सांगे सर्व नमून ।
येरु तया आश्वासून । काशीसेवन करीं म्हणे ॥२०॥

जें शर्वाचें अधिष्ठान । गंगा राहे ज्या वेष्टन ।
सर्वदेवतीर्थस्नान । तत्सेन करीं शीघ्र ॥२१॥

न कोणिही येथ अमुक्त । म्हणोनी हें अविमुक्ता ।
विरक्त किंवा विषयासक्त । तेही मुक्त होती जेथे ॥

दुजें भूमंडळीं न असें । येरु वदे मी नेणतसें ।
काशीक्षेत्र मिळेल कसें । प्रार्थितसें मी तुम्हांसी ॥२३॥

म्हणे तापसी मी दावीन । त्वद्योगें हो मज दर्शन ।
असें म्हणूनी त्या घेऊन । ये तत्क्षण मनोगती ॥

घेऊनी अला मनोगति । काशीयात्रा भावभक्तीं ।
करीं यथाविधि, निगुती । पूर्ण होती मनोरथ ॥२५॥

तो ऐकूनि त्याचें वचन । म्हणे नेणे यात्राचरण ।
येरु म्हणे स्नान करुन । मणिकर्णिकेचें येई ॥२६॥

तूं भेट विश्वेश्वरा । करीं अंतर्गृहयात्रा ।
मगदक्षिणमानसयात्रा । स्नानार्चनश्राद्धदानें ॥२७॥

इति श्री०प०प०वा०स०वि सारे काशीयात्रानिरुपणं नाम एकचत्वारिंशो०


श्री सप्तशती गुरूचरित्र अन्य अध्याय


सप्तशती गुरूचरित्र अध्याय पहिला | Saptashati Gurucharitra Adhyay 1
सप्तशती गुरूचरित्र अध्याय दुसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 2
सप्तशती गुरूचरित्र अध्याय तिसरा | Saptashati Gurucharitra Adhyay 3
सप्तशती गुरूचरित्र अध्याय चौथा | Saptashati Gurucharitra Adhyay 4
सप्तशती गुरूचरित्र अध्याय पाचवा | Saptashati Gurucharitra Adhyay 5
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 6
सप्तशती गुरूचरित्र अध्याय सातवा | Saptashati Gurucharitra Adhyay 7
सप्तशती गुरूचरित्र अध्याय आठवा | Saptashati Gurucharitra Adhyay 8
सप्तशती गुरूचरित्र अध्याय नववा | Saptashati Gurucharitra Adhyay 9
सप्तशती गुरूचरित्र अध्याय दहावा | Saptashati Gurucharitra Adhyay 10
सप्तशती अध्याय अकरावा | Saptashati Adhyay 11
सप्तशती गुरूचरित्र अध्याय बारावा | Saptashati Gurucharitra Adhyay 12

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *